आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त गोंदिया वासियांनी काढली सायकल रॅली
रॅलीमध्ये 6 वर्षाच्या बालकांपासून, महिला, 84 वर्षापर्यंतच्या वृद्धाचा सहभाग, सायकलिंग संडे ग्रुपद्वारा काढण्यात आली रॅली
गोंदिया:- आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त गोंदिया शहरात सायकलिंग संडे या ग्रुप द्वारे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल रॅलीमध्ये 6 वर्षीय बालकांसह 84 वर्षापर्यंतचे वृद्ध देखील सहभागी झाले होते, या सायकल रॅली दरम्यान ‘सायकल चलाओ पर्यावरण बचाव’ ‘सायकल चलाओ सेहद बनाओ’ चे संदेश देण्यात आले. या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांसह वृद्ध व महिला देखील सहभागी झाले होते, तर गोंदिया शहरात तील गुरुद्वारा इथून ही सायकल रॅली ची सुरुवात करण्यात आली त्याच प्रमाणे गोंदिया शहरांमध्ये ही सायकल रॅली भ्रमण करत 15 ते 20 किलोमीटर सायकल चालवत लोकांना सायकल चालवण्याचे व पर्यावरण वाचवण्याचे संदेश व आठवड्यातून एक दिवस तरी सायकल चालवावे असे संदेश यावेळी देण्यात आले.