मालगुजारी तलाव स्वच्छ करून सौंदर्यकरण करण्यात यावा-अश्विनसिह गौतम
नगर पंचायत स्वच्छ सर्वेक्षण “माझी वसुंधरा” योजनेचे ब्रॅण्ड अंबेसेडर अश्विनसिंह गौतम यांची निवेदना मार्फत मांगनी.
अर्जुनी/मोर:- निसर्गाच सर्वात सुंदर देणं आणि परराष्ट्रातील प्रवासी पक्ष्यांनच्या आश्रय स्थळ असलेला नगरातील पूर्वेस भव्य क्षेत्रफळात शोभा वाढवीत असलेला माजी मालगुजारी तवाल आपल्या दैयनिय अवस्थेवर आज रडत आहे. संपूर्ण तलावात सभोवताली जलकुंभी वनस्पती ने आपले मजबूत वास्तव्य तयार केलंय. जलकुंभी अत्यंत वेगवान गतीने संपूर्ण तलावात पसरतो.ज्यामुळे तलावातील पाण्यात ऑक्सिजन चे प्रमाण कमी होतो आणि सूर्यप्रकाश पाण्यात जात नाही आणि पाण्यात असलेला मासा ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे मरतो आणि सजीव तलाव निर्जीव स्वरूपात रूपातरीत होतो. सोबतच तलावाच्या अवती भोवती अनेक प्रकारचे विष्ठन फेकले गेले असल्याने तलावाच्या सीमेवरील भागात अत्यंत घाणीचे वातावरण तयार झाले आहे. तलावातील पातळीवर गाळ साचल्याने पाणी जास्त प्रमाणात राहत नाही.या सर्व समस्येचे तत्काळ निवारण करून तलाव स्वच्छ करून देण्याची मांगणी नगर पंचायत ब्रॅण्ड अंबेसेडर अश्विनसिह गौतम यांनी मुख्याधिकारी राजू घोडके, प्रशाकिय अधिकारी स्वच्छता प्रमुख अमोल जाधव , स्वच्छता को ऑर्डीनेटर निमिष मुरकुटे यांना निवेदना मार्फत केली आहे. या कार्यात नगरातील जलप्रेमी,निसर्गप्रेमी,स्वच्छता दुत , नगरवासी सहकार्य करणार असल्याचे अश्विनसिह गौतम यांनी सांगितले.माजी मालगुजारी तलाव हे पक्षी प्रेमियांचे आवडते ठिकाण होते.अनेक पक्षी प्रेमी यांनी तलावात प्रवासी पक्ष्यांचे वास्तव्य बघितले आहे.स्वच्छ आणि जिवंत तलाव आज काळाची गरज आहे.वाढते उष्ण वातावरण जमिनीतील पाण्याची पातळी कमी करीत आहे.अश्या परिस्थिती मध्ये आज गरज आहे आपले सुंदर नैसर्गिक देणं असलेलं तलाव वाचविण्याची असे मत अश्विनसिह गौतम यांनी यावेळी व्यक्त केलेत.