General

स्वच्छता अभियान राबवून माहेश्वरी समाज बांधवानी दिला ईश्वर आस्थेचा संदेश

अर्जुनी/मोर:- महेश नवमी उत्सव पर्वावर स्वच्छ सर्वेक्षण “माझी वसुंधरा” नगर पंचायत अर्जुनी/मोर आणि माहेश्वरी समाज संघटन तालुका अर्जुनी/मोर यांच्या संयुक्त विद्यमाने नगरातील पूर्वेस स्थित माजी मालगुजारी तलाव सोबत शीतला माता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविन्यात आला.सोबतच माहेश्वरी समाज बांधवांन तर्फे मंदिर परिसरात फळाचे झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. माहेश्वरी समाज हा शिव पूजक समूह आहे.या वर्षी ची आयोजित महेश नवमी प्रभू श्री राम चरणी अर्पित करीत माहेश्वरी समाज तर्फे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.सामाजिक कार्यात वेगवेगळ्या स्वरूपात माहेश्वरी समाज बांधवांचे सहभाग असते.नगर पंचायत ब्रँड अंबेसेंडर अश्विनसिह गौतम यांच्या हाकेला साथ देत. स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण अभियान च्या माध्यमाने आराध्य शिवशंकराला आणि अयोध्येत विराजमान झालेलें प्रभू श्री राम याना आपली आस्था समर्पित करीत असल्याचे मत माहेश्वरी समाज संघटनेचे जिल्हा संयोजक प्रकाश चांडक यांनी याप्रसंगी व्यक्त केलेत. स्वच्छता अभियान मध्ये माहेश्वरी समाज युवा संघटन मोठ्या संख्येत उपस्थित होता.या प्रसंगी प्रामुख्याने अरुनकुमार भैया,राजेश चांडक,आशिष मंत्री,कैलास राठी,पप्पू लड्डा,श्याम चांडक,केशव भुतडा,गौरव चांडक,विष्णू भैया,निमिष चिंतलागे,जुगलकिशोर राठी,कमल राठी उपस्थित होते.केलेल्या उपक्रमा बद्दल सर्वत्र माहेश्वरी समाज बांधवांचे कौतुक करण्यात येत आहे.