विदर्भ

शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयात जागतिक योगदिन साजरा

अर्जुनी मोर. :- स्थानिक शिवप्रसाद सदानंद जयस्वाल महाविद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवार (दि. 21 जून) रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. मुख्य योग प्रशिक्षक कांतीकुमार बोरकर आणि रंजना ब्राह्मणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योग साधना केली. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी श्री दुर्गा शिक्षण संस्थेचे संस्था अध्यक्ष लुनकरणजी चितलागे, प्राचार्य डॉ. ईश्वर मोहुर्ले, योग प्रशिक्षक क्रांतीकुमार बोरकर, अभिमन्यू नाकाडे, रंजना ब्राह्मणकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, तसेच पतंजली योग समितीचे योग साधक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभाग, तसेच पतंजली योग समिती अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले. बोरकर व ब्राह्मणकर मॅडम यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी सूर्यनमस्कार, वज्रासन, योग मुद्रासन, ताडासन,शवासन,धनुरासन, भुजंगासन, हास्यासन तसेच खांद्याचे, मानेचे व्यायाम योग मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अभिमन्यू नाकाडे यांनी केले तर आभार प्रा. लक्ष्मीकांत कापगते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. स्वाती मडावी प्रा. अंकित नाकाडे डॉ. आशिष कावळे, प्रा. लक्ष्मीकांत कापगते प्रा. पंकज उके कार्यक्रम अधिकारी, आमिषा चौधरी, श्रद्धा खरवडे रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाप्रसंगी बहुसंख्येने योगसाधक उपस्थित होते. तन, मन ,आत्मा आणि बुद्धी यांची सांगड घालणारा योग. भगवान पतंजली मुनींनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक ,मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. भारतीय संस्कृतीत योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याच्या प्रयत्नातून जून 21 ला आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडला गेले आहे.

दिनांक 21 जून ला दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी मोर या ठिकाणी योग दिन कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 5.45ते 7.00 या वेळेत करण्यात आले .आपण आपले आरोग्य सुदृढ व निरामय बनवू शकतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य आदरणीय जे. डी. पठाण सर यांनी केले व योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संचालन कु. लीना ढोमने हिने केले तसेच विद्यालयातील जिल्हा विभाग व राज्यस्तरावरील कु.रिया नाकाडे ,माही नाकाडे, आशुतोष गहाने, निकुंज हेमणे, अस्मिता हातझाडे ,श्रावणी वंजारी यांनी योगासनाची उत्कृष्ट प्रात्यक्षिके करून दाखविली. कार्यक्रमाचे योग दिन मार्गदर्शन विद्यालयाच्या क्रीडा शिक्षिका माधुरी पिलारे यांनी केले व आभार कु.लीना ढोमणे हिने केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित शाळेच्या उपप्राचार्या या आदरणीय सौ. घाटे मॅडम, पर्यवेक्षक आदरणीय पालीवाल सर विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी संकल्प घेऊन शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.