पो. ठाणे नवेगाव बांध अंतर्गत ट्रॅक्टर चालक व मालक यांची संभा संपत्र
नवेगाव बांध :- जिल्ह्यात सध्या पावसाळा सुरु झाल्याने जिल्ह्यांतील शेतकरी वर्गाकडून शेतीची मशागत करणे सुरु झाले आहे. ट्रैक्टर चालक हे शेतीची नांगरणी, वखरणी व चिखल करून झाल्यानंतर ट्रॅक्टरचे नांगर, कंजव्हील ची माती न काढता रोडवर चालवितात. शेतीचे काम झाल्यानंतर ट्रॅक्टर चालक नांगर व कंजव्हीलची माती काढण्यासाठी रोडवरून ट्रैक्टर चालवून माती काढण्याचा प्रयत्न करतात.अशावेळेस ट्रॅक्टरचं नागर, कंजव्हील ची माती रोडवर पडुन चिखल तयार होतो.रोडवर माती लागल्यामुळे चिखल तयार झाल्यामुळे वाहन स्लिप होवून अपघात होतात त्यामुळे रोडवर लागलेल्या माती- चीखला मुळे रोड अपघात होवुन लोकांची जिवीतहानी झालेली आहे.
या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन नवेगावबांध अंतर्गत मौजा- कवठा गट ग्राम पंचायत येथे शेतकरी वर्ग- ट्रैक्टर चालक व मालक वर्ग, यांचेमध्ये जनजागृति व्हावी याकरिता बैठकीचे आयोजन करून( दि. 22-) रोजी बैठक घेण्यात झाली.
पोलीस स्टेशन नवंगावबांध चे ठाणेदार पो. नि. योगिता चाफले यांनी सभेला संबोधित करुन ट्रॅक्टर चालक- मालक यांनी शेतीचे मशागतीची कामे आटोपल्यानंतर ट्रॅक्टर रोडवर आणण्यापुर्वी ट्रॅक्टरचं नांगर, कंजव्हील ला लागलेली माती काढूनच रोडवर ट्रॅक्टर चालविण्याबाबत तसंच वेगावर नियंत्रण ठेवण्याबाबत विनंती केली.त्याचप्रमाणे ट्रॅक्टर चालक व मालक यांनी कांजव्हीलची तसेच नांगराची माती न काढता रोडावर भरधाव वेगात ट्रैक्टर चालवितांनी मिळुण आल्यास ट्रैक्टर चालक व मालक यांचेवर कायदेशीर कारवाई केली जाईल अशा सुचना देण्यात आल्यात.
सदर सभेला पोलीस स्टेशन नवेगावबांध येथील ठाणेदार पो. नि. चाफले, पोलीस अंमलदार पोहवा गेडाम, वाघाये कवठा पोलीस पाटील भागवत डोंगरवार, डोंगरगाव येथील पोलीस पाटील रविकुमार शंकर औरसे, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, डोंगरगाव व कवठा येथील ट्रॅक्टर चालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते…