खेळ

शरीर व मन सुद्रुढ ठेवण्यासाठी नियमित योग करणे काळाची गरज करा योग,रहा निरोग -डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक

गोंदिया :- राष्ट्रीय आरोग्य अभियान,के.टी.एस.सामान्य रुग्णालय,आयुष विभाग व जिल्हा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने केटीएस सामान्य रुग्णालय परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवार (दि.21 जुन) रोजी जागतिक योग दिवस संपन्न झाला. या वर्षीचे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे ब्रिद वाक्य “स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी म्हटले आहे. यावेळी सांगितले त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,जिल्हा मौखिक अधिकारी डॉ.अनिल आटे,जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिना वट्टी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे, जिल्हा आय.पी.एच.एस. अधिकारी डॉ. स्वर्णरेखा उपाध्याय, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा साथरोग तज्ञ डॉ. सुशांकी कापसे उपस्थित होते.
सदर योग दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी सर्वात प्रथम आरोग्य देवता धन्वंतरी मातेला पूजन करण्यात आले व योग आचरणाचा संकल्प जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिना वट्टी यांनी मान्यवरांचे उपस्थित सर्व कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.यावेळी,योग प्रशिक्षक राजेश चुटे यांनी योगाचे विविध प्रकाराचे प्रात्यक्षिक व त्याचे महत्व पटवुन सांगितले तसेच त्याची जनजाग्रुती करण्यात आली.जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र व आयुष दवाखान्यामध्ये योगशिक्षकामार्फत योगाचे धडे दिले जातात त्याचा लाभ सामान्य जनतेने घ्येण्याचे आवाहन जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिना वट्टी यांनी यावेळी लोकांना केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मानवाने आपली जीवनशैलीच बदलून टाकली आहे.जीवनात कामाचा व्याप, कुटुंब जबाबदारी, वेळेचा अभाव व इतर विविध बाबीमुळे दिवसभर ऑफिसची कामे,मोबाईल व व्हाट्सअप चा वापर,अनियमित जेवणाची वेळ,उशिरा झोपण्याची सवय,फास्ट व जंक फूड खाणे,व्यायाम व चालण्याचा अभाव,मानसिक ताणतणाव,चिंता,धुम्रपान,दारू व ईतर नशा व्यसन सवयी अशा विविध बाबीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.त्यावर मात करण्यासाठी आपली भारताची प्राचीन योग विद्या ही अवलंबविने हि काळाची गरज बनली आहे.मनाला व शरीराला आरोग्यमय ठेवायचं असेल तर नियमित योग करणे हा स्वस्त व सोपा उपाय असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी सांगितले तर जीवनशैलीच्या बदलामुळे हृदयरोग,मधुमेह,उच्च रक्तदाब,स्थुलपणा, थायरॉईड वृद्धी,कर्करोग,मेंदूचे विकार,सांध्याचे विकार,मानसिक आजार अशा विविध आजारांचे माहेरघर झाले आहे.योगशास्त्र ही भारतीयांची जगाला दिलेली देणगी आहे तसेच सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार योग करण्यामुळे कमी होऊ शकतात.योगाच्या दैनंदिन आचरणामुळे निरोगी राहण्यास मदत होते तसेच रोगमुक्त होण्यामध्ये मदत होऊन सकारात्मक ऊर्जा कायम राहते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगा व संतुलित आहार घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी या प्रसंगी सांगितले आहे.