सरस्वती विद्यालयात सेवानिवृत्तीपर कृपाल खुणे व शशिकांत लोणारे यांचा सत्कार
अर्जुनी मोरगाव: सरस्वती विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक कृपाल खुणे व शशिकांत लोणारे हे 30 जूनला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.यानिमित्त त्यांचा सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तर्फे सपत्नीक भावस्पर्शी सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अग्याराम मदनगोपाल शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया होते.यावेळी संस्थेचे सचिव सर्वेश भुतडा,शाळेचे प्राचार्य जे.डी.पठान, उपप्राचार्या छाया घाटे,पर्यवेक्षक महेश पालिवाल,भगीरथ गांधी सत्कारमूर्तींच्या परिवारातील सदस्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते. कृपाल खुणे हे सरस्वती विद्यालयात 1992 पासून सहाय्यक शिक्षक या पदावर रुजू झाले तेव्हापासून आजतागायत मागील 32 वर्षापासून ते शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत होते.तर शशिकांत लोणारे 2001 पासून सहाय्यक शिक्षक या पदावर रुजू झाले तेव्हापासून आजतागायात 22 वर्षे दहा महिने अध्यापनाचे कार्य करीत होते.दोन्ही सत्कारमूर्तींचा नियोजनबद्ध कार्याचा अतिशय थाटामाटात हृदयस्पर्शी सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्ती सोहळ्या निमित्त कृपालजी खुणे व त्यांच्या अर्धांगिनी सौ.वनिता खुणे तसेच शशिकांत लोणारे व त्यांच्या अर्धांगिनी सौ.बबीता लोणारे त्यांचे सुपुत्र वैभव लोणारे उपस्थित होते. दोन्ही सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह,भेटवस्तू व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे कोषाध्यक्ष जयप्रकाश भैया यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.तसेच संस्था सचिव सर्वेश भूतडा,प्राचार्य जे.डी.पठान, उपप्राचार्या छाया घाटे,पर्यवेक्षक महेश पालीवाल,भगीरथ गांधी सह आजी माजी शिक्षकांनी खुणे सर व लोणारे सर यांच्या सेवा कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला व भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन करून आभार सुजित जक्कुलवार यांनी मानले.