जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथे नवागतांचे स्वागत
अर्जुनी मोर :- पंचायत समिती अर्जुनी /मोर अंतर्गत नजीकच्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे नवागतांचे स्वागत पुष्पगुच्छ व मिठाई देऊन करण्यात आले .कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून अर्जुनी मोरगाव चे केंद्रप्रमुख तथा शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र भैसारे यांनी नवागत बालकांचे स्वागतामागील प्रशासनाची पार्श्वभूमी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजना विशद केल्या.प्रस्तुत कार्यक्रमाच्या अनुषंगाने माहुरकुडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य कविताताई कापगते हे अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषद शाळा हे गुणवत्ता विकासाची कास धरून सर्वांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचे व्रत घेतले आहे हे निश्चितच गौरवास्पद आहे. जिल्हा परिषद शाळा मोरगाव येथील शालेय प्रशासन व शिक्षकांनी आखलेल्या नियोजनबद्ध कार्यक्रमाने अलीकडे शाळेची पटसंख्या तालुक्यात सर्वाधिक झाल्याचे दिसून येत आहे .हे सातत्य शिक्षकांनी ठेवण्यासाठी गुणवत्ता विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे, गावच्या प्रथम नागरिक गीता ताई नेवारे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रमेश लाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी लोदी, उपाध्यक्ष सोनू ताई कराडे, ग्रामपंचायत सदस्य विद्या शहारे, मुरारी उईके, प्रमिला शहारे,पद्मिनी चचाने ,देवानंद शहारे, ग्राम नीलज , महालगाव, मोरगाव येथील पालक व अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने उत्साह पूर्वक ढोल ताशाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय सडक अर्जुनी येथील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणाच्या संदर्भाने पथनाट्य सादर करून वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले व गावात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र ठवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रेवानंद उईके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्ही. बी. भैसारे, वामन घरतकर,अचला कपगते, रूपाली मेश्राम आदींनी केले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना
पाठ्यपुस्तके वितरण करून व गोड भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.