वडेगाव बंद्ध्या येथील पालकांनी शिक्षकांच्या पूर्ततेसाठी पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णयाची केली अंमलबजावणी
अर्जुनी मोर :- तालुक्यातील वडेगाव बंद्या येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत इयत्ता एक ते सात वर्ग असून पटसंख्या 113 आहे मात्र शिक्षक दोन असल्याने तर तीन शिक्षक पदे रिक्त असल्याने वारंवार शिक्षकांची मागणी करूनही शाळेला शिक्षक मिळाले नसल्याने दिनांक पाच जुलैपासून आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेऊन निर्णयाची अंमलबजावणी केली आहे येथे येथे सात वर्गासाठी पाच शिक्षकांची पदे मंजूर असून एक प्राथमिक शिक्षक व दोन पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत मागील वर्षी रिक्त पदे असल्याने शैक्षणिक कार्य अडचणी आल्या होत्या सात वर्गांना दोन शिक्षक कसे काय शिकवू शकतात असा प्रश्न पालकांना पडला आहे शाळा आहे पण शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शिक्षक नसल्याने पालकांचा शाळेवरील विश्वास उडालेला आहे 29 जून रोजी शाळा व्यवस्थापन समितीने दोन शिक्षक मिळण्यासंदर्भात ठराव पारित करून चार जुलै पर्यंत दोन शिक्षकांची शाळेवर नियुक्ती न झाल्यास शुक्रवारपासून एकही विद्यार्थी शाळेत येणार नाही व विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार शिक्षण विभाग राहील असा ठराव घेण्यात आला आहे अशा आशियाची निवेदन शाळा व्यवस्थापन समितीने गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच शिक्षण सभापती यशवंत गणवीर जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाठबांधे व इतरांना देऊन सुद्धा अजून पर्यंत पूर्तता न झाल्याने दिनांक पाच जुलै पासून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही
या संदर्भाने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यशवंत गणवीर यांना प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली असता शिक्षक संख्या कमी असून शिक्षण भरती द्वारे येणाऱ्या शिक्षकांमधून त्या शाळेला शिक्षक पुरविण्यात येईल तसेच ग्रामपंचायत ने शिक्षण स्वयंसेवकाची नियुक्ती करावी जेणेकरून शिक्षण देता येईल शिक्षण विभागातर्फे त्या शाळेला शिक्षक देण्याची कार्यवाही येत्या काळात पार पाडू असे सांगितले.