मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अटी शिथिल करा माजी जि.प. सदस्य किरण कांबळे यांची मागणी
अर्जुनी मोर :- महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली ही आनंदाची बाब असून परिपत्रकानुसार सुरुवातीला ज्या अटी लावल्या होत्या त्या अति शासनाने शिथिल केल्या परंतु आणखीन काही अटी जाचक असल्यामुळे महिलांना कागदा पत्रांची पूर्तता करताना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे जाचक अटींमुळे विहित मुदतीत महिलांना आवेदन करणे शक्य होणार नाही अनेक महिला या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने या योजनेतील आणि अंतोदय कार्डधारकांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात यावी ग्रामपंचायत रहिवासी दाखला घेताना घरट्याक्स भरणे अनिवार्य करू नये अर्ज सादर करण्याची मुदत वाढवून देण्यात यावी शासनाने 65 वर्षापर्यंतची अट शिथिल करून ती अमर्याद करण्यात यावी शेतू केंद्राची व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी जेणेकरून महिलांना त्रास होणार नाही मुलींना केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत द्यावे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या मुलींना मिळणारा एक रुपया भत्ता वाढवून तो दहा रुपये करण्यात यावा या मागणीचे निवेदन माजी जिल्हा परिषद सदस्य किरण ताई कांबळे यांनी माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदार अर्जुनी मोर यांच्यामार्फत दिनांक पाच जुलै रोजी देण्यात आले यावेळी अर्जुनी मोर नगरपंचायत च्या सदस्या सुषमा दामले तालुकाध्यक्ष सौ शुभांगी राखडे वंदना पवार निरूपा बोरकर व इतर महिलांच्या उपस्थितीत देण्यात आले