डॉ.अभिजीत गोल्हार जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी प्रा.आ. केंद्र दवणीवाडा येथे घेतला क्षयरोग बाबतचा आढावा
गोंदिया :-जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी गोंदिया तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दवणीवाडा येथे (दि. 2)रोजी आकस्मिक भेटी देवुन क्षयरोग व कुष्ठरोग कामकाजाची पाहणी केली.त्यावेळी त्यांचे सोबत क्षयरोग विभागाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,प्राथमिक आरोग्य केंद्र दवणीवाडाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.फहीम,पीपीएम प्रज्ञा कांबळे यांचेसह आरोग्य केंद्राचा स्टाफ व ईतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.अभिजीत गोल्हार यांनी भेटी दरम्यान आरोग्यवर्धिनी केंद्र दवणीवाडा येथील प्रसुतीगृह, प्रयोगशाळा, माहेरघर ,आंतररुग्ण वार्ड, औषधी साठा केंद्र ई.ची पाहणी करुन लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या द्रुष्टीकोनातुन सुधारणा करण्याच्या सुचना वैद्यकिय अधिकारी यांना देण्यात आल्या.त्यात प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमितपणे करणे,सर्व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहुन आरोग्य सेवा देणे,आरोग्य संस्थाचे रेकॉर्ड अद्यावत करणे,बाह्यरुग्ण सेवा(ओपीडी) दरम्यानच्या वेळेत रुग्णांना वेळेत चांगल्या सोयी देण्यात याव्यात, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी नियमित गावनिहाय भेटीचे नियोजन करणे,पर्यवेक्षांनी उपकेंद्रांना भेटी देवुन सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा आढावा घेण्यात यावा, हलचल रजिस्टरवर नोंदी करुनच मुख्यालय सोडावे. सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करण्यात यावी. कर्मचारी यांनी कर्तव्यस्थानी ओळखपत्र व ड्रेस कोड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,टेलिकंन्सल्टेशन सेवेचे सामुदायिक आरोग्य अधिकारी मार्फत योग्य नियोजन करणे,गरोदर मातेला प्रसुतीपुर्व व प्रसुतीपस्चात नियमित सेवा देणे,एन.सी.डी. कार्यक्रम अंतर्गत कार्यक्षेत्रातील 30 वर्षावरील महिला व पुरुषांची तपासणी करणे,आरोग्य विषयक जनजागृती साहित्य लोकांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे, तसेच सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचे आढावा घेवून उदिष्ट निहाय कामाची प्रगती असावी या बाबत सुचीत करण्यात आले.
भेटी दरम्यान क्षयरोग व कुष्ठरोग बाबत होत असलेल्या कामकाजाची पाहणी केली.जिल्ह्यात क्षयरोगबाबत विविध ईंडीकेटरनुसार क्षयरोग कार्यक्रम राबवुन लोकांना अविरत आरोग्य सेवा देण्याबाबत सुचना दिल्यात.यात प्रामुख्याने विविध लक्षणेनुसार संशयित क्षयरोग व कुष्ठरोग आजाराचे रोगी शोधणे,शोधलेल्या संशयित क्षयरोग लोकांचे आरोग्य संस्थेत थुंकी नमुने किंवा एक्स-रे तसेच विविध प्रयोगशाळा तपासणी मोफत करणे.क्षयरोग निघालेल्या रुग्णांना नि:शुल्क औषधोपचार सुरु करणे,औषधोपचार दरम्यान फॉलोअप ठेवणे,समुपदेशन करणे,निक्षय पोर्टलवर नोंदणी करणे,निक्षय पोषण योजनेचा लाभ देणे,रुग्णांचे दस्तावेज ऑनलाईन करणे,सहवासी लोकांचे तपासणी व औषधोपचार,टिबीग्रस्त लोकांना कुठल्याही औषधांचा आरोग्यावर दुष्प्रभाव न होवु देणे, टि.बी. मुक्त ग्रामपंचायत अशा विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.