विदर्भ

ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे फिजिओथेरपी कॅंप संपन्न

सड़क /अर्जुनी :- दुखापती, अपघात, शस्त्रक्रिया यातून बरे होणाऱ्या आणि तीव्र वेदनांनी त्रस्त असलेल्या अनेक लोकांसाठी फिजीओथेरपी लाइफ चेंजिंग असू शकते. शारीरिक थेरपी म्हणजेच फिजिओथेरपीमध्ये स्नायूंना बळकट करण्यासाठी, जखम बरे करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी व्यायाम, मालिश आणि उपचारांचा एक सेट असतो.शारिरीक थेरपी लोकांमध्ये गतिशीलता आणि चांगले जीवन जगणे सोपे करू शकते.शारीरिक थेरपीमध्ये विविध अॅक्टिव्हिटीचा समावेश होतो.त्यामध्ये तुम्ही तुमचे शरीर स्वतः हलवण्यासाठी व्यायाम, थेरपिस्ट तुम्हाला हलविण्यास मदत करतात असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयात भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांच्या पथकामार्फत फिजीओथेरपी बाह्यरुग्ण सेवा दिली जात असुन रुग्ण व लोकांना व्यायामविषयक मार्गदर्शन दिले जात आहे.
दि. 2 जुलै रोजी रोजी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत भौतिकोपचार तज्ञ डॉ.कांचन भोयर यांनी व्यायाम विषयक मार्गदर्शन केले त्यासोबत रुग्ण तपासणी व उपचार करण्यात आले. महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे भौतिकोपचार तज्ञ ओपीडीच्या वेळेत मार्गदर्शनासाठी उपलब्ध असल्याची माहीती असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांनी दिली आहे. तसेच जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.अनिल आटे यांनी रुग्णांना रक्तदाब,मधुमेह व कॅन्सर बाबत मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजाराबाबत जनजागृती करून तंबाखू न खाण्याची शपथ रुग्णांना ह्या वेळी देण्यात आली.सदर शिबीरादरम्यान ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे डॉ.अनिल आटे,डॉ.मेश्राम, डॉ.पाटील, फार्मासिस्ट बुके,तावडे, लॅब असिस्टंट कठाणे, प्राची पंचभाई,थोरात सिस्टर,मेंढे सिस्टर, गार्ड सेलोटे यांनी आरोग्य सेवा दिली. ह्या वेळी ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनीचे सर्व स्टाफ व कर्मचारी उपस्थित होते.