General

महादेवराव शिवणकर आयुर्वेदिक कॉलेज कुडवा येथे क्षयरोग कोअर समन्वय समितीची बैठक संपन्न

गोंदिया :- क्षय रोगांच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता
(दि. 12 जुलै) रोजी कुडवा येथील महादेवराव शिवणकर आयुर्वेदिक कॉलेज येथे क्षयरोग कोअर समन्वय समितीची बैठक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांचे मार्गदर्शक सुचनेनुसार संपन्न झाली.त्यावेळी एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज कुडवाचे अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ्.अभिजीत गोल्हार,प्राचार्या डॉ.जयमाला शिर्के यांच्या उपस्थितीत पार पडली.सदरील बैठकीमध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत विविध मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या मोहिमअंतर्गत बहुक्षेत्रीय दृष्टीकोन प्रणाली अनुशंगाने सरकारी, नागरी आणि खाजगी क्षेत्र यांच्यातील सहकार्याने क्षयरोगासंबधी संयुक्तपणे धोरण साध्य करणे महत्वाचे आहे.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम व खाजगी आयुर्वेदिक महाविद्यालय व इतर सर्व खाजगी संस्था यांनी सयुक्तिकरित्या एकत्र येवून सन 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त देश करणे असे उद्दिष्ट असल्यामुळे इतर सर्व खाजगी आरोग्य संस्थाचl सहभाग होणे अत्यंत आवश्यक आहे.
संशयित क्षयरुग्ण शोधून त्याचे पोर्टलवर नोंदणी, हॉस्पिटल भेटी दरम्यान संशयित क्षयरुग्नाचे स्वतंत्र रजिस्टर करुन नोंदी ठेवणे,संसयित क्षयरुग्नाचे दूषित थुंकी नमुने गोळा करून लगतच्या तपासणी केन्द्राकडे पाठविणे,पीपीएसए एजन्सी मार्फत कार्यरत कर्मचारी यांनी थुंकी नमुने जवळच्या तपासणी केन्द्राकडे वाहतुक करणे,डॉट्स सेंटर तयार करुन नाजिक च्यl क्षयरुग्णाला इथेच औषधी देण्यात यावी,महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी व कार्यरत आरोग्य कर्मचारी यांचे सुधारीत क्षयरोग कार्यक्रमाचे प्रशिक्षण घेणे,वैदकिय महाविद्यालयातून संदर्भित होणाऱ्या सर्व संसयित क्षयरुग्नाचे क्षयरोग कार्यक्रमा मार्फत सुक्ष्मदर्शी, सिबीनँट,ट्रुनँट व एक्सरे तपासणी मोफत करणे, रुग्णांना मोफत औषधोपचार करण्याबाबत सुसुत्रता करणे,निक्षयं पोषण योजने अंतर्गत नवीन क्षयरुग्न शोधल्यास रु.500/- प्रती रुग्ण महाविद्यायालl देणे,क्षयरुग्नाच्या संपर्कातील नातेवाईकांना टिपीटी औषधोपचारा देणे, आतीजोखमीचे रुग्ण जसे की डायबेटिक रुग्ण, सँम-मॅम चे लाभार्थी, कुपोषित बालके, गरोदर माता, कर्करोग ग्रस्त रुग्ण, किडनी आजारी असणारे , धूम्रपान करणारे, स्थलात्तरित कामगार यांनी एक दिवसाचा खोकला असला तरी थुंकी नमुने तपासणी करणे ईत्यादी विविध बाबीवर चर्चा करण्यात आली.

व्यापक प्रमाणात क्षयरोग आजाराची व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम ची प्रसिध्दी करण्यात यावी. त्याच बरोबर उपलब्ध सोई सुविधा ची माहीती या वेळी आयुर्वेदिक कॉलेज प्रशिक्षणार्थीनां यावेळी देण्यात आली.
प्रधानमंत्री टीबीमुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत मागील वर्षी 65 ग्रामपंचायती पात्र झालेल्या आहेत. त्यांचा सत्कार कार्यक्रम जिल्हाधिकारी यांचे अधक्षतेखlली घेण्यात येणार आहे.त्याच बरोबर यावर्षी वर्षी सुद्धा टीबी मुक्त ग्रामपंचायत टीबी फोरम समिती तयार करून प्रत्येक ग्रामपंचायत येथे सभा घेण्यात येत आहे.याबद्दल चर्चा करण्यात आली.
क्षयरोग कोअर समन्वय समिती बैठक दरम्यान यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे व डॉ.देव चांदेवlर यांचेसहीत जिल्हा क्षयरोग केंद्राचे जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे ,आरोग्य सहाय्यक नागपुरे,पर्यवेक्षक उर्मिला बघेले,पीपीएसए आशिष तसेच महादेवराव शिवणकर महाविद्यालयातील नोडल ऑफिसर रहांगडालेजी, वैदकिय अधिकारी, प्राध्यापक व इतर आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.