मादक पदार्थ विरोधात रासेयो प्रहरी
अर्जुनी मोर:- स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘बालकांमध्ये ड्रग्स आणि मादक पदार्थांचा प्रसार आणि अवैध तस्करी प्रतिबंध’ या विषयावर जनजागृती करिता विद्यार्थ्यांच्या ‘प्रहरी गटाची निर्मिती व जनजागृती उपक्रम’ नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या करिता पोस्टर तयार करणे स्पर्धा आयोजित करण्यात आली व प्रहरी क्लब ची स्थापना करण्यात आली.
समाजात वाढणारी व्यसनाधीनता सर्वांसाठी फार मोठी समस्या बनली आहे. याचे दुष्परिणाम शालेय विद्यार्थ्यांत जाणवत आहेत. याचाच भाग म्हणून स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांकरिता व्यसनांविरोधात पोस्टर तयार करणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याकरिता शाळेचे प्राचार्य जे.डी. पठाण, उप प्राचार्या सी.एस. घाटे व पर्यवेक्षक महेश पालीवाल यांच्या मार्गदर्शनात प्रहरी गटाची स्थापना रासेयो विद्यार्थ्यांमधून करण्यात आली. याकरिता रासेयो कार्यक्रम अधिकारी आय. एच. काशीवार व जे. आर. शेळके यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी व्यसनांविरोधात समाज जागृती करण्याची शपथ घेतली.