General

आयुष्यमान आरोग्य मंदिर गिरोला येथे जेष्ठ लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

गोंदिया :- आजच्या काळात 40-60 वयोगटातील काम करणाऱ्या पिढीसाठी कुटुंबातील वृद्ध ज्येष्ठ/पालकांचे आरोग्य सांभाळणे हे खरंतर एक आव्हानच झालं आहे. अशातच आपल्या घरातील वृद्धांची जे खरंतर मानसिक आणि शारिरीक समस्यांनी ग्रस्त आहेत अशा रूग्णांची काळजी कशी घ्यावी हा खरंतर प्रश्नच आहे.
वृद्धांची काळजी घेणाऱ्यांना भेडसावणाऱ्या काही समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रम अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर गिरोला येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांच्या कल्पक विचारातुन गावातील वयोवृद्ध व जेष्ठ लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दि.11 जुलै गुरुवारी रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर गिरोला येथे संपन्न झाले.शिबीराप्रसंगी 72 वयोवृद्ध व जेष्ठ व्यंक्तीची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आला.
गिरोला येथील सरपंच कौतुकाबाई कांबळे व पंचायत समिती सदस्या शिलाताई ब्राम्हणकर यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ लोकांची तपासणी करण्यात आली.शिबिरामध्ये वयोवृद्ध लोकांचे आरोग्य तपासणी, रक्त तपासणी, रक्तदाब, मधुमेह, सिकलसेल, हिमोग्लोबीन तपासणी सोबतच योग विषयी प्रात्यक्षिक व मार्गदर्शन करण्यात आल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले यांनी याप्रसंगी दिली आहे.त्याच दिवशी आयुर्वेद औषधी वनस्पती जनजागृती माहीती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. योगशिक्षिका मुनेश्वरी राऊत यांनी विविध योगाचे प्रात्यक्षिक व त्याचे महत्व याची माहीती लोकंना समजवुन सांगितले.
वय वर्ष साठी पार केल्या वर एकदा निवृत्त झाल्यानंतर ज्येष्ठ लोकांमध्ये मानसिक आणि वर्तणुकीतील वृत्तींमध्ये बदल होतो.ज्येष्ठांना भावनिक आणि शारीरिक अशा दोन्ही विशिष्ट गरजांची जाणीव नसते.अशा वेळी त्यांचे अनपेक्षित गैरवर्तन ओळखणे आणि टाळणे याबद्दल जागरूकता निर्माण करणे गरजेचे असते.असंयम, स्मृतिभ्रंश, हालचाल ही ज्येष्ठांना भेडसावणारी एक गंभीर समस्या आहे ज्यामुळे जीवनाच्या एकूण गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगितले.
जेष्ठ लोकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी सरपंच कौतुकाबाई कांबळे,पंचायत समिती सदस्या शिलाताई ब्राम्हणकर,वैद्यकीय अधिकारी डॉ.भुमेश्वर पटले समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्वीनी येडे व खुशबु रहांगडाले,आरोग्य सेवीका दुर्गा फुंडे, आशा सेविका ममता कटरे,सुनंदा रोकडे,अनुसया पटले,यशोदा फुंडे,खेमलता अवासरे, परिचर भुमिताई ठाकरे, योगशिक्षिका मुनेश्वरी राऊत यांनी शिबीराप्रसंगी रुग्णसेवा देवुन सहकार्य केले.