विदर्भ

पावसाळ्यातील आजारांपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती आहेत फायदेशीर

जिल्ह्यामध्ये एकूण 26 आयुर्वेदिक दवाखाने व 7 आयुष दवाखाने ज्यामध्ये आयुर्वेद,होमिओपॅथी, युनानी व योग पद्धतीने रुग्णावर होतात उपचार
सर्वत्र हर्बल गार्डन बनविण्यावर देण्यात येत आहे विशेष भर
-डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी

गोंदिया :- प्रत्येक ऋतूच्या संधिकाळात वातावरणातील बदलामुळे तसेच त्या हंगामात असणाऱ्या हवामानाच्या प्रभुत्वामुळे सर्व सजिवांना कमी-जास्त प्रमाणात त्रास होतो. म्हणजेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या मुख्य ऋतूंच्या संधिकाळात वातावरणातील बदलाचा शारीरिक समतोल राखताना शरीरावर काही ताण येतात, त्या वेळी या ताणांनी आपल्याला थोडय़ाफार प्रमाणात आजारपण येण्याची शक्यता असते.उदा.उन्हाळ्यात पित्तप्रकोप पावसाळा, हिवाळा, कफप्रकोप होण्याची खूप शक्यता असते. पावसाळ्यात सर्दी-पडसे तर हिवाळ्यात छातीत कफ दाटून येतो.आजकाल तर वातावरणातील बदलांची गती नियमित राहिलेली नाही.यामुळेसुद्धा अनेक आजार सर्व सजिवांना होत असतात. यात शारीरिक व मानसिक दोन्हींचा समावेश असतो. अगदी नैराश्यापासून तापापर्यंत अनेक व्याधी वाढतात.यांचे निराकरण आपण वेगवेगळ्या वनस्पतींचे वेगवेगळे भाग वापरून करू शकतो.
जिल्ह्यात आयुष सेल 2008 पासून कार्यरत असुन सुरुवातीला केवळ केटीएस सामान्य रुग्णालय येथे आयुर्वेद रुग्णालयातुन रुग्णांवर उपचार मिळत होते. त्याची व्याप्ती वाढुन सात आयुष दवाखाने त्यात जिल्हा के.टी.एस. रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा,ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध,ग्रा.रु.आमगाव,ग्रा.रु.अर्जुनी मोरगाव,ग्रा.रु.देवरी मध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी,युनानी व योग पद्धतीने रुग्णावर उपचार सुरु झाले आहे.त्यासोबतच जिल्ह्यातील 26 आयुर्वेदिक दवाखान्यातुन आयुर्वेदिक औषधांचे व वनस्पतीचे जनतेपर्यंत ज्ञान पोहोचण्याकरता आयुर्वेदिक दवाखानामध्ये हर्बल बगीचा तयार करण्यात येत आहे.त्याचे उपयोग कसे करावे याबाबतचे प्रचार व प्रसिद्धी करण्यात येते तसेच वृद्धांसाठी शिबिरे आयोजित करण्यात येत असल्याची माहीती जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिना वट्टी यांनी दिली आहे. वर्ष 2023-24 मध्ये आयुष सेल अंतर्गत आयुर्वेदाचे 43699, होमिओपॅथी 42653, युनानीचे 8462, योगाचे 8407, पंचकर्म 3739 असे एकुण 106960 रुग्णांना सेवा उपचार देण्यात आले आहे.तसेच जिल्ह्यातील आयुर्वेदीक दवाखान्यांतर्गत 73535 रुंग्णाना आयुर्वेदीक उपचार व 947पंचकर्म सेवा देण्यात आल्याची माहीती डॉ.मिना वट्टी यांनी दिली आहे तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की आपण आपल्या कार्यक्षेत्रातील लगतच्या आयुर्वेदीक दवाखान्यात जावुन आपले उपचार निशुल्क करुन घ्यावे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीचे आजार देखील वाढू लागतात साथीच्या आजारांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते.पावसाळ्यामध्ये लहान मुले आणि वृद्ध लगेच आजारी पडण्याची शक्यता असते. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पती गुणकारी आहेत.या वनस्पतींचा काढा प्यायला नंतर आरोग्य संबंधित अनेक समस्या दूर होतात.शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुळवेल अतिशय प्रभावी मानली जाते.शरीराची डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी गुळवेल उपयुक्त आहे.स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी शंखपुष्पी वनस्पतीचे सेवन केले जाते.तुळस ही एक औषधी वनस्पती असून घरातील अंगणात तुळशीचे एक तरी रोप हे असतेच.शरीराचे रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी तुळस गुणकारी आहे.आयुर्वेदामध्ये अश्वगंधा या वनस्पतीला विशेष महत्त्व आहे ही आयुर्वेदिक वनस्पती तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी मदत करते तसेच अश्वगंधाचे सेवन केल्याने झोपे संबंधित समस्या दूर होतात.हर्बल वनस्पतीमध्ये अश्वगंध हा कुष्ठरोग,चिंताग्रस्त विकार,रक्तवाहिन्यासंबंधी रोग, संधिवात आणि सर्व प्रकारचे अशक्तपणासाठी शक्तीवर्धक म्हणून आणि जोम व चैतन्य निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. ब्राह्मी जो अपस्मार,वेडेपणा आणि स्मरणशक्ती नष्ट होणे यासारख्या मानसिक विकारांच्या उपचारांमध्ये वापरली जाते.जवस मध्ये रक्तदाब आणि लठ्ठपणा कमी करण्याची क्षमता असते हळदीमध्ये कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत आणि ते डीएनए परिवर्तन नोटेशन रोखू शकतात याव्यतिरिक्त त्यात अँटीसेप्टिक आणि अँटी-इम्प्लिमेंटरी गुणधर्म देखील आहेत. सांधेदुखी बरा करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
औषधी वनस्पती सामान्यतः रक्तदाब कमी होणे,हृदयी व रक्तवाहिन्यासंबंधी रोग रोखणे किंवा कर्करोगाचा धोका कमी करणे असे अनेक आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.जैवविविधता सुधारणा व्यतिरिक्त ही झाडे ऑक्सिजनची पातळी वाढवण्यात आणि वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यास देखील मदत करतात.