शैक्षणिक

निवासी शाळेत लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी

गोदिंया : शहरालगतच्या नंगपूरा-मुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठूले यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील शिक्षक प्रदीप ढवळे, नीता भलमे, साधना पारधी, अस्मिता तेलंग, मुन्नाभाई नंदागवळी, अर्चना चव्हाण, कार्तिक शहारे, स्वाती राणा, तुषार महाजन आदी उपस्थित होते.
यावेळी दोन्ही महापुरुषांच्या जीवनावर शिक्षक व विद्यार्थी यांनी आपले मत व्यक्त केले. प्रसंगी लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमांना पुस्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जयंती कार्यक्रमाचे संचालन व आभार शालेय विद्यार्थी यांनी करून समारोप करण्यात आला.