वडीलांची स्मृती जपण्यासाठी स्मशानभूमीत केला वृक्षारोपण
समाजासाठी एक आदर्श : वृक्षारोपण संवर्धनाला दिले बळ
बाराभाटी :
स्थानिक ठिकाणच्या काही सामाजिक कार्यकर्ते यांनी गाव खारीतील स्मशानभूमीत वडीलांच्या आठवणीबद्दल वृक्षारोपण करून समाजाला संदेश दिला. हे एक आदर्शव्रत बाब समजायला काहीच हरकत नाही.
वडील मृत्यू पावले. वडील दु:ख पचवणारा आणि हृदयांंकित जपणारा मानवतेचा झरा आहे. कितीही दु:ख असले तरी वडील नावाचा व्यक्तीमत्व हे दाखवत नाही.
एक आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी अभियंता नितीन कांबळे यांच्या पुढाकाराने स्मशानभूमीत पिंपळ वृक्षासह अनेक वृक्षांचे रोपण केले. यावेळी मनोहर कांबळे, मुन्नाभाई नंदागवळी, प्रफुल्ल वालदे, देवेंद्र बनसोड, अविष कऱ्हाडे, प्रणित रामटेके यांनी सहकार्य केले.
वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचे महत्त्व यानिमित्ताने समाजाला दिले गेले. वृक्ष लावणे व जगविणे काळाची गरज आहे. एक वृक्ष जगला तर अनेक माणसांना सावली देतो. आधार देतो अशाप्रकारे वृक्षाचे महत्त्व माणसाच्या जीवनात फार आहे.
———
वडीलांची आठवण, सामाजिक सलोखा जपत वृक्षांचे महत्त्व जीवनात फार आहे. म्हणून वृक्षारोपण यानिमित्ताने केले.
– नितीन कांबळे, बाराभाटी