ग्रामपंचायत कर्मचारी वेतनापासून वंचित, कुटुंबावर आली उपसमारीची पाळी…!
सडक अर्जुनी:- पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येत असल्येल्या ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचा-याचे माहे एप्रिल २०२२ ते नोव्हेबंर २०२२ चे वेतन प्रलंबित असतांनाच पुन्हा एफ्रिल,मे व जुन २०२४ चे वेतन मिळाले नाही. त्यामुळे कर्मचारी वेटनापासून वंचित असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.ग्रामपंचायत कर्म-याचा वाली कोण?असा प्रश्न तालुक्यात निर्माण झालेला आहे.वेतनासंबंधी शासनाने अनुदान जमा करणे या विषयी अनेक वेळा पाठपुरावा व प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले. पंरतु, कर्मचा-याचे वेतन मिळाले नाही. तालुक्यातील वेतन न मिळालेल्या ग्रामपंचायती खोबा,बाम्हणी,परसोडी,कोदामेडी,उशखेडा,घाटबोरी/ते,शेन्डा,कन्हारपायली आदी ग्रामपंचायतील कर्मचारी विलास कुरसुंगे,चंद्रशेखर डोये,नरेश जमदाळ,प्रकाश लेदे, खुशाल बनकर, योगेश बनकर, संदीप मडावी, सोमेश्वर वंजारी, चुन्नीलाल परतेकी,शिशुपाल साखरे आदी कर्मचारी असून ते आजही नियमित कामे करीत आहेत.परंतु,वेतनाचे काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. संपुर्ण गावाची पाण्याची व स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणा-या कर्मचा-याची वेतनाची सोय करा. याबाबत तालुका ग्रामपंचायत कर्मचारी तक्रार निवारण सभेत मुद्दा मांडण्यात आला . वेतन न दिल्यास ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी समोर आंदोलन करण्यात येईल.याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या तालुका सभेतनिर्णय घेण्यात आला.
————-
* येत्या 7 ऑगस्ट पर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन न झाल्यास 8 ऑगस्टपासून पंचायत समितीसमोर ग्रामपंचायत कर्मचारी उपोषण आंदोलन करतील.
-चत्रूगण लांजेवार,
जिल्हा अध्यक्ष,ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ.