9 आँगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा
सड़क अर्जुनी :- 9 आँगस्ट 2024 रोज शुक्रवारला जागतिक आदिवासी दिन तेजस्विनी लाँन ( शेंडा रोड ) सडक / अर्जुनी येथे मोठ्या उत्साहाने पार पडला. सर्वप्रथम बिरसा मुंडा चौक सडक अर्जुनी येथे क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे व सप्तरंगी ध्वजाचे पुजन करून मा. तेजरामजी मडावी नगराध्यक्ष नगरपंचायत स. / अर्जुनी यांच्या अध्यक्षतेखाली , मा. रंभाबाई प्रधान ( ज्येष्ठ नागरिक ) यांच्या हस्ते सप्तरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहनानंतर भुमकाल तीरुमाल – धर्मराज ऊईके , सुधाकर टेकाम , अविनाश मडावी यांनी सुमरण पाटा गायन केले.
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने बिरसा मुंडा चौक येथून रँलिला सुरवात झाली. डिजेवर गोंडी गाणे वाजवत , जय सेवा – जय जोहार व आदिवासी महापुरुषांच्या अमर रहे – अमर रहे अशा घोषणा देत. रँली शेंडा चौक येथे आल्यानंतर नाँन क्रिमीलीयर अट रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या. तेजस्वी लाँनच्या प्रवेशद्वारावर ऊपस्थित पाहूण्याचे सप्तरंगी दुपट्टे व बँचेस लावून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला . कार्यक्रमाचे उदघाटक – मा. मनोहरजी चंद्रिकापुरे , आमदार अर्जूनी / मोरगाव विधानसभा क्षेत्र ,सह उदघाटक – मा. राजकुमारजी बडोले माजी कँबिनेट मंत्री ( म. राज्य ) कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा. भरतभाऊ मडावी , अध्यक्ष गो. गो. स. संघटना जि. गोंदिया , उपाध्यक्ष – मा. तेजरामजी मडावी नगराध्यक्ष नगरपंचायत स./ अर्जुनी , प्रमुख अतिथी म्हणून मा . मिलींदजी कुरसुंगे राज्य सचिव आदि. हलबा / हलबी कर्मचारी महासंघ , मा. अजयजी लांजेवार एस. चंद्रा group संस्थापक , मा. मधुकर गावराने पर्यवेक्षक जंगल कामगार सहसंघ गोंदिया , मा. राजकुमार हेडाऊ स्वि. नगरसेवक मा. मा. चेतनजी वळगाये पं. स. सदस्य , मा. कामिनीताई कोवे नगरसेविका , मा. निर्मलाताई ऊईके माजी सभापती , मा. सुधाकरजी पंधरे मा. पं. स. सदस्य , मा. सुषमा मरस्कोल्हे सरपंच , मा. विलास वट्टी सरपंच , मा. विनोदजी पुसाम सरपंच , मा. मालती वट्टी उपसरपंच मा. प्रकाशबापु मडावी मा. उपसभापती , मा. सुशील लाडे पत्रकार , मा. लताताई कुंभरे , मा. सायलीताई सयाम , मा. किरणताई ईस्कापे ,मा. प्रल्हादजी वरठे, मा. लक्ष्मीकांतजी धानगाये , मा. यशवंतजी सलामे , मा. आंनदजी टेकाम , मा. गंगाधरजी कुंभरे , मा. यशवंतजी धुर्वे व आदिवासींच्या विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. लेखलाल टेकाम मा. अध्यक्ष गो. गो. स. सं. यांनी केल्यानंतर मा. सौ. छाया देवचंद टेकाम यांना त्याच्या कार्याबद्दल राणी दुर्गावती पुरस्काराने सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आले. मा. शोभिलाल ऊईके यांना सुद्धा बिरसा मुंडा पुरस्काराने सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. बिरसा मुंडा पुतळ्यासाठी जमिन दान देणारे मा. सम्राट प्रधान , सिव्हिल इंजिनिअर पदावर रूजू झालेले मा. मुनेश्वर कोसमे यांचासुद्धा सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच L. L. B. शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थी कु. कल्याणी बलदेव कोटवार , कु. खुशी रमेश वाढिवे , नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथे प्रवेश पात्र ठरलेले कुश सुरेश अमले , हिमांशू वरखडे , योगेश येल्ले , ईयत्ता 10 वी व 12 वी मध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी स. / अर्जुनी तालुक्यातील विविध गावातील मुला – मुलीनी गोंडी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला संपूर्ण स./ अर्जुनी तालुक्यातील आदिवासी समुदाय ऊपस्थित होता.
नँ. आ. पि. फेडरेशन , नँ. आ. ए. फेडरेशन , आदि. हलबा / हलबी स. संघटना , आदि. महिला संघटना , गो. गो. स. संघटना , आदि. विद्यार्थी संघ चे सर्व आजी माजी पदाधिकारी यांनी सहकार्य करून 9 आँगस्ट जागतिक आदिवासी दिन यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. मधुकर टेकाम तर आभार राजेश मंडारी यांनी मानले