जयदुर्गा विद्यालय गौरनगर येथे शालेय मंत्रिमंडळ गठित
मोरगाव अर्जुनी:- श्री गणेश बहुउद्देशिय संस्था अर्जुनी मोरगाव द्वारा संचालित जयदुर्गा हायस्कूल एवं ज्यु. कॉलेज गौरनगर येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळ गठित करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी निवडणूक करिता आपल्या नावांची नोंदणी केली. आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली त्यानंतर लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.
सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक परिमल मंडल यांच्या निरीक्षणाखाली पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहाय्यक शिक्षक संतोषकुमार बिसेन, संघदीप कांबळे, वैशाली कळपते यांनी क्रमशः केंद्राध्यक्ष ,मतदान अधिकारी म्हणुन काम पाहिले. तर शाळेचे प्राचार्य सुनीलकुमार पाऊलझगडे हे निवडणूक अधिकारी म्हणून यावेळी उपस्थित होते.
अनिश मंडल, खुशी मिस्त्री यांची क्रमशः विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली तर प्रताप सरकार, नितीन सरकार,संजय तरुआ,अर्जुन सरकार,विवेक मंडल,पायल सरकार प्रिया सरकार,गायत्री मंडल, ज्योतीका बाच्छाड, प्रतिमा वैद्य इत्यादी विद्यार्थी विविध समित्यांवर निवडून आले .
प्रत्येक वर्गातून निवडून आलेल्या प्रतिनिधींचा निवडणूक मंडळामध्ये समावेश करण्यात आला होता. एकंदर एकूण 105 विद्यार्थ्यांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला.
मान्यवरांकडून निवडणूक प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
सहाय्यक शिक्षक कांतीकुमार बोरकर यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक शिक्षक प्रवीण शिंगाडे,नितीन गणवीर,प्रफुल्ल गोलेलवार, नीरज नाकाडे, धीरज सरकार, भुवेंद्र चौहाण,ममता लंजे इत्यादींनी परिश्रम घेतले.