शैक्षणिक

शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री येथे संविधान मंचाची स्थापना

प्रास्ताविकेचे वाचन : मंच निर्मिती, संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धा

गोंदिया :
शहराला लागून असणाऱ्या नंगपूरा-मुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे (दि. 15 ऑगस्ट) रोजी सकाळी ११.२० वाजता संविधान मंच स्थापन करण्यात आले.

यावेळी शाळेतील मुख्याध्यापक रविशंकर इठुले यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील शिक्षक नीता भलमे, प्रदिप ढवळे, साधना पारधी, अस्मिता तेलंग, मुन्नाभाई नंदागवळी, कार्तिक शहारे, स्वाती राणा, अर्चना चव्हाण आदी उपस्थित होते.

याप्रसंगी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय ग्रंथ भारतीय संविधान या प्रतीची पुजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

या निमित्ताने शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी संविधान प्रश्न मंजूषा स्पर्धा वर्ग सहावी ते दहावी करिता घेण्यात आली. यामध्ये तीन समुह पाडण्यात आले. जयभीम समुह, भीम सैनिक समुह व भीम शक्ती समुह या समुहापैकी भीम सैनिक समुह हा विजयी झाला. यामध्ये अनामिक दुर्योधन, हेमंत लागे, अंश राऊत, असित दुवे व रौनक अंबादे हे विजयी झाले. यांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आकर्षक निवेदन माध्यमिक शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. नंतर सर्व वर्गांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.