स्वात्तत्र्यंदिनी उल्लेखनीय कामासाठी क्षयरोग विभागाचा पालकमत्र्यांनी केला सत्कार
राष्ट्रीय क्षयरोग नियत्रंण कार्यक्रम प्रभाविपणे राबविण्यात राज्यात अव्वल
उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पालकमत्र्यांनी केला गौरव
गोंदिया :- राष्ट्रिय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात गोंदिया जिल्ह्याने क्षयरोग नियत्रंण कार्यक्रम गेल्या आठ महिन्यापासुन प्रभाविपणे राबवुन राज्यात अव्वल ठरला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्याचे केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशकानुसार क्षयरोग कार्यक्रम मध्ये केलेल्या कामानुसार रैंकिंग केले जाते.त्या मध्ये राज्यात गोंदिया जिल्ह्याने प्रथम क्रमांक प्राप्त केले आहे.त्याची दखल घेत स्वातत्र्यंदिनाचे औचित साधुन जिल्हाधिकारी प्रशासनाने क्षयरोग विभागातील अधिकारी व कर्मचार्यांचा उल्लेखनीय कामासाठी दि.15 ऑगस्ट रोजी कारंजा येथे पोलिस मुख्यालयातील ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी गौरव केला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री मा.धर्मरावबाबा आत्राम यांनी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे व डॉ.देव चांदेवार तसेच पीपीएम.समन्वयक प्रज्ञा कांबळे यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवुन सत्कार केला.
जिल्हा स्तरीय सत्कार कार्यक्रम प्रसंगी जिल्हाधिकारी मा.प्रजित नायर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.एम.मुरुगानंथम,पोलिस अधिक्षक मा.गोरख भामरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नितीन वानखेडे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे,कुष्ठरोग विभागाचे डॉ.भाग्यश्री गावंडे यांचेसह जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी,शालेय विद्यार्थी,पोलिस,पत्रकार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते,
जिल्ह्यात जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या नेतृत्वात तब्बल 12 विविध ईंडीकेटरनुसार क्षयरोग कार्यक्रम राबवुन लोकांना अविरत आरोग्य सेवा देण्यात येत आहे.यात प्रामुख्याने विविध लक्षणेनुसार संशयित क्षयरोग आजाराचे रोगी शोधणे,शोधलेल्या संशयित लोकांचे आरोग्य संस्थेत थुंकी नमुने किंवा एक्स-रे तसेच विविध प्रयोगशाळा तपासणी मोफत करणे.क्षयरोग निघालेल्या रुग्णांना नि:शुल्क औषधोपचार सुरु करणे,औषधोपचार दरम्यान फॉलोअप ठेवणे,समुपदेशन करणे,निक्षय पोर्टलवर नोंदणी करणे,निक्षय पोषण योजनेचा लाभ देणे,रुग्णांचे दस्तावेज ऑनलाईन करणे,सहवासी लोकांचे तपासणी व औषधोपचार,टिबीग्रस्त लोकांना कुठल्याही औषधांचा आरोग्यावर दुष्प्रभाव न होवु देणे अशा विविध बाबींवर पर्यवेक्षण करण्यात येत असते.
क्षयरोग आरोग्य कार्यक्रम व उपक्रमांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्याने राज्यात प्रथम येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याने पटकावला आहे.डॉ.अभिजित गोल्हार यांच्या नेतृत्वात जिल्हा क्षयरोग विभागाने उत्क्रृष्ट सांघिक कार्य व गाव पातळीवर केलेले सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर राज्यात प्रथम येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याने पटकावला असल्याने गौरव करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी प्रशासनाने म्हटले आहे.
गोंदिया जिल्हा भौगोलिक दृष्ट्या महाराष्ट्राच्या सीमा लगतचा शेवटचा जिल्हा आहे. आदिवासी, नक्षलग्रस्त व जंगलव्याप्त सीमा अशी जिल्ह्याची ओळख आहे.विविध आजार बळावलेले असतात. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा क्षयरोग विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवुन हे यश संपादन केले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी याप्रसंगी क्षयरोग विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
क्षयरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक कामाचा सत्कार
सदर सन्मान प्राप्त करताना सांघिक कार्यामुळेच हे शक्य झाले आहे.जनजागृती, सर्वेक्षण व उपचार ह्या त्रिसुत्रीच्या जोरावर क्षयरोग विभाग कार्य करीत आहे. जिल्हास्तरिय प्रशासकिय अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हा क्षयरोग विभागाचे वैद्यकिय अधिकारी तसेच आठही तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी यांचे उत्कृष्ट नियोजन सर्व वैद्यकीय अधिकारी यांचे प्लॅनिंग तसेच आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य विस्तार अधिकारी यांचे पर्यवेक्षण आणि गाव पातळीवरचे सैनिक आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यिका,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,फार्मासिस्ट,सामुदायिक आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका,आशा सेविका यांनी लोकांना गुणात्मक सेवा दिल्याने व त्या कामांचे अहवाल करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर,तालुकास्तरीय कर्मचारी,राष्ट्रीय आरोग्य अभियान टिबी कार्यक्रम अंतर्गत एस.टी.एस.,एस.टी.एल.एस, टीबीएचव्ही.,पी.पी.एम.,कार्यक्रम समन्वयक, पर्यवेक्षक यांनी उत्तम प्रकारे सादरीकरण केल्याने जिल्ह्याची रँकिंग प्रथम क्रमांकावर आली आहे.
-डॉ.अभिजीत गोल्हार, जिल्हा क्षयरोग अधिकारी