सडक अर्जुनी येथे कडकडीत सामूहिक बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.
कोहमारा टी पॉईंट ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा. तीन हजारच्या जवळपास रॅलीत नागरिक सहभागी.
शाळा, महाविद्यालये बंद होती.तहसीलदरांमार्फत राष्ट्रपतींना आरक्षण कृती समितीच्या वतीने निवेदन
सडक अर्जुनी.:- अनुसूचित जाती, जमातीमधील एकता तोडून या प्रवर्गामध्ये उपवर्ग निर्माण करण्याचा तसेच सर्व प्रवर्गाला क्रिमिलेअर लावण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अनुसूचित जाती, जमातींचे आरक्षण संपूष्टात येणार आहे. या निर्णया विरोधात
एस सी, एस टी, ओबीसी आरक्षण बचाओ कृती समिती सडक अर्जुनीच्या वतीने आणि सर्व समाजाच्या वतीने बुधवारी (ता. 21) सामूहिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंद ला व्यापारी व इतर दुकानदारांनी तसेच नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने 100 टक्के कडकडीत बंद यशस्वी झाला.ट्रॅक्टरने व इतर साधनाने खेड्यापाड्यातून नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आले होते.यानिमित्त 11 वाजता कोहमारा टी पॉईंट ते सडक अर्जुनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्याजवळ मोर्चा आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा नेवून सभा घेण्यात आली.सभेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुसंघाने मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.
त्यानंतर एस सी, एस टी, ओबीसी आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.सदर मोर्च्यात तीन हजारच्या जवळपास पुरुष -महिला सहभागी झाले होते.
उल्लेखनीय म्हणजे, सडक अर्जुनी प्रमाणेच कोहमारा, शेंडा, डव्वा, पांढरी, सौन्दड, जांभळी व इतर गावात बंद पाडण्यात आला.
100 टक्के बंद यशस्वीकरण्यासाठी एस सी, एस टी, ओबीसी आरक्षण बचाओ कृती समितीचे कार्यकर्ते, व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी सहकार्य केले.