General

रुग्णालय परिसरात वृक्ष लागवड करुन परिसर ऑक्सिजन युक्त करा -डॉ.अमरिष मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक

गोंदिया :- 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन समारंभ कार्यक्रम के.टी.एस. सामान्य रुग्णालय गोंदिया येथे संपन्न झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार विविध नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्याच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या.त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे यांच्या कल्पक विचारातुन के.टी.एस.परिसरात वृक्षारोपण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार दि.15 ऑगस्ट रोजी के.टी.एस. सामान्य रुग्णालयाच्या मागे औषधी भांडारच्या बाजुला असलेल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय घोरमारे,मानसोपचार तज्ञ डॉ.लोकेश चिर्वतकर,बालरोग तज्ञ डॉ.सचिन उईके, डॉ.योगेश पटले,मनिष मदने,निशांत बन्सोड,प्रशांत बन्सोड,दिलीप ब्राम्हणकर यांचे सह सामान्य रुग्णालयाचे स्टाफ उपस्थित होते.
ऑक्सिजनशिवाय आपण जगूच शकत नाही.झाडे ऑक्सिजन ची निर्मिती करतात. रुग्णालय परिसरात वृक्षारोपण केल्यास वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.झाडं ऑक्सिजन बनवतात आणि ते हवेत प्रसार करतात हवा श्वास घेत असताना आपण आपल्या शरीरात ऑक्सिजन घेऊन आपल्या आयुष्यात जगतो. तसेच आपल्या परिसरातील विषारी घटक कार्बन डायऑक्साइड आपल्या वातावरणामुळे किंवा आपल्या पर्यावरणास विषारी बनविते. झाडे हा कार्बन डाय ऑक्साईड वापरतात आणि त्यामुळे आपल्या पर्यावरण सुरक्षित रहात असल्यामळे सर्व आरोग्य संस्थानी आपला रुग्णालयाचा परिसर विविध वृक्ष लावुन त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिष मोहबे यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन समारंभ कार्यक्रम प्रसंगी केले.