वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षांना राखी बांधून साजरा केला अनोखा रक्षाबंधन !
अर्जुनी मोर:- भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जात असलेला राखी पौर्णीमेचा सण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो . या दिवशी बहिणी प्रेमाचे प्रतिक म्हणुन भावांना राख्या बांधतात आणी बहिणीचे रक्षण करावे तसेच त्यांच्या प्रिय भावास दीर्घायुष्य लाभावे, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात . नेमका हाच संदेश वापरून सरस्वती ज्ञानदीप कॉन्व्हेन्ट व जी. एम.बी हायस्कूल येथील स्काऊट गाईडच्या विद्यार्थीनिंनी शाळेतील स्वतः लागवड व संवर्धन केलेल्या वृक्षांना म्हणजेच मातृवृक्षांना राख्या बांधून वृक्ष आमचे भाऊ असून ते दिर्घायुषी व्हावे व प्रदूषणाच्या दैत्यापासून आमचे रक्षण करावे अशी प्रार्थना केली. या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या शैव्या जैन, समन्वयक भगीरथ गांधी , स्काऊट गाईड प्रमुख नबी शेख, शिक्षिका संध्या ठाकूर , नूतन वैद्य, श्रध्दा कापगते, दिक्षा शेंडे, रजनी गुले, मोनिका बलगुजर तारीका हरिणखेडे, मनीषा नाकाडे, योगिता गायधनी, आदी शिक्षकांनी उपक्रमात सहभाग घेतला.
सर्वत्र होणाऱ्या वृक्ष तोडीमुळे निसर्गाचा समतोल बिघडला परिणामी ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न जागतिक समस्या बनली .यावर उपाय म्हणुन वृक्ष लागवडी सोबतच वृक्षसंवर्धनाची गरज ओळखुन शाळेत रक्षाबंधनाचा हा सण मागील अनेक वर्षापासून साजरा केला जातो त्यानुसार राखी पौर्णिमे निमीत्त परिसरातील वृक्षांना वृक्षरक्षा बंधन करण्यात आले . सदर उपक्रम केवळ औपचारिकता म्हणुन न राबविता वेळोवेळी या वृक्षांच्या सुरक्षीततेची खात्री करून व वेळ पडल्यास त्यांच्या सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा मानस सुद्धा शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केला .वृक्ष रक्षाबंधनासाठी पर्यावरणाला हानीकारक असणार्यां घटकांना वगळुन स्वत:च्या हाताने तयार केलेल्या राख्यांचा वापर करुन वृक्ष रक्षाबंधन साजरे केले.