General

डॉ.भारत लाडे यांचा सामाजिक योगदाना बद्दल केशोरी येथे सत्कार

अर्जुनी/मोरगाव – देशाची सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण आपल्या समाजातील वंचित, शोषित, उपेक्षित घटकांची सेवा करणे, त्यांच्या अत्यावशक गरजा पूर्ण करणे हे एक थोर कार्य आहे. याच जाणिवेने प्रेरित होऊन गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून सातत्याने डॉ भारत लाडे, सामाजिक कार्यकर्ते हे अर्जुनी मोरगाव या सारख्या दुर्गम भागातील जनतेची अनेक प्रकारे सेवा करतात. त्यांनी सातत्याने या भागातील सर्वसामान्य जनतेचे आरोग्य, शिक्षण, व आर्थिक समस्यांवर उपाय केले आहे.आजवर त्यांनी आपल्या मित्र परिवार व सेवाभावी संस्थांच्या मदतीने अनेक आरोग्य शिबिर आयोजित केले, अनाथ मुलांना आश्रय दिला, शिक्षणास मदत केली तर कित्येकांना आर्थिक सहाय्य केले आणि हे सेवाकार्य अजूनही सुरूच आहे. त्यांच्या या समाजकार्याने गरीब गरजू हजारो रुग्णांना मदत झाली अनाथांना आश्रय मिळाला, महिलांचे आरोग्य जपले, अंधांना दृष्टी प्राप्त झाली. याची दखल घेऊन मेघे गृप हॉस्पिटल आणि जीवन आधार फाउंडेशन ,रोटरी क्लब नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ भारत लाडे यांचा त्यांनी केलेल्या या कार्याचा गौरव करत शाल, श्रीफल आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. या दोन्ही संस्थांनी मिळून त्यांच्या या समाजकार्याची पोचपावती म्हणून त्यांचे हे सत्कार केले आहे.याप्रसंगी मेघे गृप हॉस्पिटल आणि जीवन आधार फाउंडेशन, रोटरी क्लब नागपूरचे जीवन जौंजाळ, सुभाषराव सांगोळे, अश्विन रडके, ठाकरेजी केशोरी जि प सदस्य श्रीकांत घाटबांधे,अर्जुनी/मोरगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष घनश्याम धामट,भरनोलीचे पंचायत समिति सदस्य फुलचंद बागडेरिया, डॉ देवेंद्र गहाणे, डॉ.प्रमोद भिवापुरे,सामाजिक कार्यकर्ते विनोद गहाणे,तेजराम झोडे, अरुण मस्के, दादाजी मरसकोल्हे, विकास रामटेके,यशवंत भोगारे, वासुदेव मडावी, प्रीतम रामटेके रहेमान खान पठाण, हरिभाऊ मडावी, ,डॉ भारत लाडे मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.