“किलकारी” गरोदर महिला व मातांचा रक्षक जिल्ह्यातील 2634 गरोदर महिला व मातांनी घेतला लाभ
गोंदिया :- जिल्ह्यात दि. 7 फेब्रुवारी 2024 पासुन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातर्फे गरोदर महिलांच्या सुरक्षेसाठी ‘किलकारी’ ही नवीन योजना आणि आशा सेविकांसाठी मोबाईल अकादमी सुरू करण्यात आल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे. गोंदिया जिल्ह्यातील मार्च अखेर अहवालानुसार 2634 गर्भवती महिला व प्रसूत मातांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे डॉ.वांनखेडे यांनी सांगितले आहे.
किलकरी हा राज्यातील सर्वात मोठा मोबाईल-आधारित मातृ संदेश कार्यक्रम, तो भारतातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 दशलक्ष महिला आणि त्यांच्या मुलांपर्यंत पोहोचला आहे आणि सध्या 3.5 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत.
किलकारी ही एक मोबाइल आरोग्य शिक्षण सेवा आहे जी गर्भवती महिला, नवजात माता आणि त्यांच्या कुटुंबांना प्रजनन, माता, नवजात आणि बाल आरोग्याविषयी वेळेवर, सुलभ, अचूक आणि संबंधित माहिती प्रदान करते. हा कार्यक्रम भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या भागीदारीत राबविण्यात येत आहे.आणि कुटुंबांचे ज्ञान आणि जीवन वाचवणाऱ्या प्रतिबंधात्मक आरोग्य पद्धतींचा अवलंब करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
किलकारी सध्या वेळ-संवेदनशील ऑडिओ माहिती थेट कुटुंबांच्या मोबाईल फोनवर वितरीत करण्यासाठी इंटरएक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स (IVR) तंत्रज्ञान वापरते. गर्भधारणेच्या दुस-या तिमाहीपासून ते मूल एक वर्षाचे (७२ आठवडे) होईपर्यंत ज्या गंभीर कालावधीत सर्वाधिक माता आणि बालमृत्यू होतात, तो कॉल कव्हर करतात.
सदस्यांना दर आठवड्याला एक प्री-रेकॉर्ड केलेला कॉल प्राप्त होतो, जो स्त्रीच्या गर्भधारणेच्या अवस्थेला किंवा मुलाच्या वयाची पूर्तता करतो. किलकारी आठ भाषांमध्ये उपलब्ध आहे (हिंदी, बिहारी, ओरिया, आसामी, बंगाली, तेलुगु, मराठी आणि गुजराती) .
राज्यामध्ये किलकारी व मोबाईल अकादमी कार्यक्रमाचा शुभारंभ दि. 7 फेब्रुवारी 2024 रोजी शुभारंभ करण्यात आला.किलकारी व मोबाईल अकादमी हा केंद्र शासनाचा कार्यक्रम आहे.ज्यामध्ये थेट आरसीएस पोर्टलवरील नोंदणीकृत गरोदर माता व बालके यांचे पालक यांच्या आरसीएच पोर्टलवरील नोंदणीकृत मोबाईल नंबर वर देय आरोग्यसेवा बाबत ध्वनीमुद्रित संदेश दिला जातो.हि योजना देशातील 20 राज्यांमध्ये सुरू आहे.जिल्ह्यात सुमारे 5461 गरोदर मातांनी नोंदणी केली आहे.योजनेंतर्गत गर्भवती महिलेला गावातील आशा सेविकेकडे नोंदणी करावी लागते.
नोंदणीकृत गरोदर मातेला चौथ्या आठवड्यापासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक, शारीरिक स्थिती इत्यादींबाबत मोबाईलवर मोफत मार्गदर्शन केले जात आहे. ‘प्रसवपूर्व, प्रसवोत्तर, प्रत्येक कुटुंबासह किलकारी’ हे योजनेचे ब्रीदवाक्य आहे.
गोंदिया जिल्ह्यात मार्च 2024 च्या अहवालानुसार शहरी व ग्रामीण भागात 5461 गर्भवती महिलांची नोंद आहे. दर महिन्याला गर्भवतींची नोंद होते. आशा सेविकांच्या कौशल्याला वाव देण्यासाठी मोबाईल अकादमीचा शुभारंभ करण्यात आला आहे. याद्वारे गोंदिया जिल्ह्यातील १२१२ आशा सेविकांना त्यांच्या कामात उपयुक्त ठरणारे ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे.
किलकारी कार्यक्रमांतर्गत देय आरोग्य सेवा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून गरोदर महिलांनी सद्य स्थितीत सुरु असलेला मोबाईल क्रमांक आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्या कडे देण्यात यावे. सदर कार्यक्रमांतर्गत किलकारी कॉलरचा नवीन क्रमांक 0124-4451660 हा आहे.
नोंदणीकृत गरोदर मातेला चौथ्या आठवड्यापासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत औषधे, आहार, लसीकरण, मानसिक, शारीरिक स्थिती इत्यादींबाबत मोबाईलवर मोफत मार्गदर्शन केले जात आहे.’प्रसवपूर्व, प्रसवोत्तर, प्रत्येक कुटुंबासह किलकारी’ हे योजनेचे ब्रीदवाक्य आहे. किलकारी ही एक मोबाइल आरोग्य शिक्षण सेवा आहे जी गर्भवती महिला, नवजात माता आणि त्यांच्या कुटुंबांना प्रजनन, माता, नवजात आणि बाल आरोग्याविषयी वेळेवर, सुलभ, अचूक आणि संबंधित माहिती प्रदान करते.
-डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
किलकारी म्हणजे बाळाचे खिदळणे.ही केंद्रीकृत संवादात्मक ध्वनी प्रतिसाद (आयव्हीआर)आधारित मोबाईल आरोग्य सेवा आहे.गर्भधारणा,बाळंतपण आणि बालसंगोपनविषयक ७२ श्राव्य संदेश थेट कुटुंबांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीपासून मूल एक वर्षाचे होईपर्यंत आई व बाळाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोफत, साप्ताहिक दूरध्वनी संदेश देण्यात येतो.जे माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे.व वेळीच काय व कशाप्रकारे काळजी घ्यावी, याबाबत मातांना जागरूक बनविण्यात मोलाची कामगिरी करत आहे.
-डॉ. रोशन राऊत, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, गोंदिया