खेळ

शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री व्हॉलीबॉल संघ विजयी

विजयी संघ जिल्ह्यावर खेळणार : तालुकास्तरीय व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक

गोदिंया :
तालुक्यातील नंगपूरा-मुर्री येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळाच्या चमुने वयोगट चौदाचे संघ तालुका व्हॉलीबॉल खेळात प्रथम क्रमांक पटकवून विजयी झाला.

सदर सांघिक खेळ हे क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी अंतर्गत व्हॉलीबॉल मुले खेळ सुरू आहेत. सदर स्पर्धा ही क्रीडा अधिकारी कार्यालय येथील पटांगणावर विजयी सामना (दि.२९) दुपारी ०२.०० वाजता झाला. यामध्ये गोदिंया तालुक्यातील व्हॉलीबॉल वयोगट चौदा, सतरा व १९ असे होते. यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा नंगपूरा-मुर्री या चमुने सहभाग घेऊन वयोगट चौदाचे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल प्रथम क्रमांक विजयी झाला आहे.

यामध्ये सहभागी विद्यार्थी कार्तिक नहामुर्ते, सागर कोहरे, आदित्य कोकोडे, लखन पेंदाम, विक्रांत टेंभूर्णे, गौरव जमदाळ तसेच मार्गदर्शक शिक्षक मुन्नाभाई नंदागवळी व कार्तिक सहारे यांनी सराव करून घेतले. मुन्नाभाई नंदागवळी यांनी व्हॉलीबॉल खेळाचे नवनवीन टिप्स देत विजय प्राप्त केले.

विजयाच्या यशाबद्दल सहायक आयुक्त विनोद मोहतूरे यांच्या नेतृत्वात शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर इठूले यांनी अभिनंदन करत शाळेचे शिक्षक प्रदिप ढवळे, नीता भलमे, साधना पारधी, अस्मिता तेलंग, स्वाती राणा, अर्चना चव्हाण तुषार महाजन आदी शाळेतील कर्मचारी व बाह्य स्त्रोत कर्मचारी यांनी अभिनंदन करुन पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.