राजकीय

चारभट्टी/पुयार येथे श्रावणमास समाप्ती निमित्ताने हमुमान पठण व महाप्रसाद

मोरगाव अर्जुनी:–चारभट्टी/पुयार येथे श्रावणमास समाप्ती निमित्ताने दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेल्या हनुमान चालिसा पठण व महाप्रसादाच्या कार्यक्रमात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. नानाभाऊ पटोले यांनी सहभागी होत मारुतीरायाचे नाम स्मरण केले. संकट मोचक हनुमंताच्या कृपेने महाराष्ट्रावरील अस्मानी व सुलतानी दोन्ही संकटे दूर व्हावीत अशी मनोकामना केली.

याप्रसंगी मा. केंद्रीय मंत्री विलासरावजी मुत्तेमवार, मा. मंत्री सतिशजी चतुर्वेदी, मा. मंत्री नितीनजी राऊत, मा. खासदार शिशुपाल पटले, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार हिरामण खोसेकर, मा. आमदार दिलीपजी बन्सोड, शफिजी लद्धानी, गंगाधरजी जिभकाटे, मदनजी रामटेके, स्वातीताई वाघाये, डॉ. मनीषाताई निंबार्ते, शितलताई राऊत, श्मेशजी डोंगरे, रसिकाताई रंगारी, विशाखाताई माटे, जि. प. सदस्य भंडारा श्री. भरतजी खंडाईत, . प्रेमजी गणवीर, . धनंजय तिरपुडे,. उत्तमजी भागडकर, भागवंतजी नाकाडे आदी मान्यवर उपस्थित होते.