शैक्षणिक

सरस्वती विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

अर्जुनी मोरगाव: – स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जे.डी.पठाण तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल प्रा.टोपेश बिसेन, प्रा. नंदा लाडसे वरिष्ठ शिक्षक लोकमित्र खोब्रागडे उपस्थित होते‌.सर्वप्रथम माता सरस्वती तसेच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.शिक्षणाने मनुष्य सुसंस्कृत होऊन त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो म्हणून जितके ज्ञान मिळेल तितके आत्मसात करा असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून प्राचार्य जे.डी. पठाण यांनी केले.स्वयंशासन या उपक्रमांतर्गत मुख्याध्यापक म्हणून ओम परमार तर पर्यवेक्षिका म्हणून धन्यता बोरकर यांनी कार्य पार पाडले.यावेळी वर्ग आठ ते बाराच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी शिक्षक म्हणून कार्य पार पाडले.कार्यक्रमाचे संचालन करून आभार वर्ग नववीची विद्यार्थीनी संचिता शहारे नी मानले.कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतल.