अर्जुनी/मोर.पोलिसांची मोहाफुल दारू विक्रेत्यांवर धाड
अर्जुनी मोर. :- शेतातील मोह फुलाचे उपयोग( दि. – 03) रोजी अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मौजा बाक्टी येथील अशोक प्रभू शहारे आपले घरी मोहाफुल दारूची हात भट्टी लावून दारू काढत आहे. अशा माहितीवरून पोलीस ठाणे अर्जुनी मोर च्या पथकाने न धाड टाकून मातीच्या मडक्यात 25 लिटर मोहाफुल दारू तसेच 20 किलो मोहाचा सडवा असा एकूण 7000/- रुपयांच्या मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच गावातीलच रेखा रणवीर मेश्राम या महिलेच्या घरी दारू बाबत झडती घेतली असता घराचे मागील खोलीत मोहफुलाची हातभट्टीवर दारू काढतानी (चालू स्थितीत) मिळून आल्याने सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये मातीच्या मडक्यात 30 लिटर मोहफुलाची दारू व 20 किलो मोहफुलाच्या सडवा असा एकूण 8000/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने वरील दोन्हीही आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. अर्जुनी/मोर. चे ठाणेदार पोनि- कमलेश सोनटक्के यांच्या निर्देशावरून सदरची कार्यवाही अर्जुनी/मोर. पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मेश्राम, पो. हवा. रमेश सेलोकर, पो.हवा. बेहेरे, पोशी. कागणे, महिला पोलीस हवालदार भुरे, महिला पोलीस शिपाई पंधरे चालक पो. हवा. भाजीपाले आदींनी केली आहे .