नेत्रदान करुन अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करा -डॉ.अमरिश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक
गोंदिया :- राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये 25 ऑगस्ट ते आठ सप्टेंबर या दरम्यान नेत्रदान पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे यामध्ये जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विशेष नेत्र तपासणी व शिबिरांच्या आयोजन करून सामान्य जनतेमध्ये नेत्रदान जनजागृती करण्यात येत असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.तर नेत्रदानाला महादान म्हणतात नेत्रदान करुन अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे यांनी या नेत्रदान पंधरवाडा प्रसंगी केले आहे. नेत्रदानासाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि प्रोत्साहित करणे, नेत्र प्रत्यारोपण किंवा नेत्रदानाशी संबंधित विविध गैरसमज दूर करणे या उद्देशाने हा पंधरवाडा साजरा केला जात असल्याची माहीती सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी याप्रसंगी दिली.
नेत्रदानामुळे अंधांना जग पाहण्याची संधी मिळते.परंतु सामाजिक व धार्मिक परंपरांमुळे किंवा भीती व गोंधळामुळे लोक नेत्रदान करण्यास घाबरतात. दुसरीकडे ज्यांना असे करायचे आहे, ते नेत्र प्रत्यारोपणाशी संबंधित आवश्यक माहिती नसल्याने नेत्रदान करू शकत नाहीत. नेत्रदानाविषयी जनजागृती वाढवणे, त्यासंबंधीच्या गैरसमजांची सत्यता लोकांना जागृत करणे आणि मृत्यूनंतर नेत्रदान करण्यास प्रवृत्त करणेनेत्रदानबाबत जनजागृती करण्यात येते नेत्रदान प्रति असलेल्या गैरसमज दूर करणे यामुळे नक्कीच नेत्रदान ही सामाजिक कार्य तळागळातील लोकापर्यंत पोहोचेल व लोक नेत्रदान करण्यासाठी समोर येतील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरेश मोहबे यांनी नेत्रदान पंधरवाडा निमित्त जनजागृती प्रभातफेरीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली.
जिल्हा आरोग्य प्रशासन, के.टी.एस.सामान्य रुग्णालय, नेत्र विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या एकत्रित सहकार्याने “नेत्रदान पंधरवाडा” अभियानाच्या अनुशंगाने दि.28 ऑगस्ट रोजी प्रभातफेरी माध्यमातुन जनजागृती करण्यात आली.जनजागृती प्रभातफेरी केटीएस सामान्य सामान्य रुग्णालय येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले.रॅली दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे,नेत्र शल्य चिकित्सक डॉ.चंद्रकिशोर पारधी,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती जयस्वाल,डॉ.घोरमारे,नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले,नेत्र विभागातील वैद्यकिय अधिकारी डॉ.सागर,डॉ.श्रुती गायधनी, डॉ.पोयाम,डॉ.अनिल आटे,डॉ.निलेश जैन यांचे सहित स्टाफ नर्स दोनो व एले उपस्थित होते.प्रभातफेरी केटीएस सामान्य रुग्णालय येथून ईंदिरा गांधी स्टेडियम मैदान-बाजार चौक-जयस्तंभ चौक भागात प्रभातफेरी काढण्यात आली. विविध संदेश देत जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरी द्वारे समाजामध्ये जनजागृती निर्माण होण्यासाठी विविध प्रकारचे माहिती फलक विध्यार्थ्यानी घेऊन फेरीत सहभाग घेतला.शेवटी नेत्रदान संकल्प प्रतिज्ञा घेवुन जनजागृती करण्यात आली.