आरोग्य विभागाची “राईज” कार्यक्रमाची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
“राईज” ही एक शाश्वत, नाविन्यपूर्ण, सानुकूलित क्षमता निर्माण यंत्रणा आहे जी नियमित लसीकरणावरील मानक वर्ग प्रशिक्षणाला पूरक ठरणार
-डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी
गोंदिया :- केंद्र शासनाचा रॅपिड इम्युनायझेशन स्किल एन्हांसमेंट (RISE) “राईज” महत्वपुर्ण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत असुन त्यासंबधाने जिल्हा,तालुका व क्षेत्रीय कर्मचार्यांचे प्रशिक्षण पुढील दिवसात पुर्ण करण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली आहे.सदर कार्यक्रमामुळे नियमित लसीकरणासंबधी माहीती आरोग्य कर्मचारी,लाभार्थी यांना मोलाची ठरणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अमरीश मोहबे यांनी या वेळी म्हटले आहे.
“राईज” ही एक शाश्वत, नाविन्यपूर्ण, सानुकूलित क्षमता निर्माण यंत्रणा आहे जी नियमित लसीकरणावरील मानक वर्ग प्रशिक्षणाला पूरक आहे.हे तंत्रज्ञान देशभरात भौगोलिक आणि अनुलंब विस्तारत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मोठ्या आकारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांमध्ये ह्या सहज तंत्रज्ञानाचा प्रसार होणार आहे.
दि.28 ऑगस्ट रोजी “रॅपिड इम्युनायझेशन स्किल एन्हांसमेंट (RISE)” बाबत एक दिवसाचे प्रशिक्षण कार्यशाळा जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी गोंदियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे संपन्न झाली.त्या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अमरीश मोहबे, सहाय्य्क जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन कापसे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल, जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे यांची उपस्थिती होती. त्यावेळी पुणे कार्यालयाचे राईज प्रोजेक्टचे व्यवस्थापक नीरज गुप्ता यांनी RISE कार्यक्रम बाबत सविस्तर माहिती दिली.यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय तिरोडा व बी.जी.डब्ल्यु रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,तसेच आरोग्य विभाग, के.टी.एस. व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नीरज गुप्ता यांनी राईज कार्यक्रम हा अद्ययावत अभ्यासक्रम, वेगाने बदलणाऱ्या युआयपी लसीकरण मार्गदर्शक तत्त्वांना संबोधित करणे,रिअल-टाइम मॉनिटरिंगद्वारे सहाय्यक पर्यवेक्षण,शिकणाऱ्यांच्या गरजांसाठी लवचिक परस्परसंवादी डिजिटल स्व-शिक्षण व – वैविध्यपूर्ण केडरची पूर्तता करण्यासाठी शाश्वत कार्यक्रम मोलाचा ठरणार असल्याचे सांगितले.
राईज ॲप मुळे लक्ष्यित प्रेक्षकांच्या नोकरीच्या जबाबदाऱ्या आणि कामाच्या वातावरण,मजबूत, कार्यक्रमाच्या गरजेनुसार अंतर्भूत आणि अद्ययावत करणे आणि अशा प्रकारे प्रभावी ज्ञान प्रसारास अनुमती देणे,विश्वासार्ह, कौशल्ये आणि नोकरीची कामगिरी सुधारण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण ठरणार असल्याचे सांगितले.शाश्वत, विद्यमान प्रशिक्षण यंत्रणा बदलून न घेता त्यांची कार्यक्षमता, पोहोच आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी पूरक ठरणार आहे.राईज अँपमध्ये पाच मॉड्यूल आहेत:त्यात प्रामुख्याने लसीकरण वेळापत्रक आणि सत्र व्यवस्थापन,इंजेक्शन सुरक्षा आणि लस प्रशासन,शीत साखळी व्यवस्थापनाची तत्त्वे,लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटना व लस संकोच हाताळण्यासाठी संप्रेषण ई.मुळे नियमित लसीकरण कार्यक्रम राबविताना आरोग्य कर्मचारी व लाभार्थ्यांना मोलाचे ठरणार आहे.