२८ सप्टेंबर २०२४ रोजी सडक अर्जुनी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
सडक अर्जुनी:- माननीय नामदार उच्च न्यायालय बॉम्बे व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती, सडक अर्जुनी, वकील संघ सडक अर्जुनी तसेच पंचायत समिती सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सडक अर्जुनी येथील सभागृहात दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी आयोजीत राष्ट्रीय लोक अदालत मधे ठेवण्यात आलेल्या दाखलपुर्व प्रकरणा संबंधी आढावा बैठक घेण्यात आली याप्रसंगी सडक अर्जुनी न्यायालयाचे न्यायाधीश डॉ.. विक्रम आव्हाड यांनी उपस्थित ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांना दाखलपूर्व प्रकरणाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच नवीन फौजदारी कायद्याबद्दल कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. सदर शिबिरामध्ये पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आर. आर. सानप, ओ .एस .गहाने सहा. सरकारी अभियोकता, एडवोकेट एम .एस. रामटेके, सहा. अधिक्षक लांजेवर, लिपिक जूबेर खान, लिकेश्वर ठलाल,अविनाश शेंद्रे व पंचायत समिती सडक अर्जुनी येथील कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय लोकअदालत मधे तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे, चेक बाऊन्स चे प्रकरणे, कौटुबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५, गुन्हा कबुलीची प्रकरणे ई. तसेच दाखलपूर्व ग्रामपंचायत, नगरपंचायत चे टैक्स प्रकरणे ठेवण्यात येवून त्याचा समाजस्याने निपटारा करण्यात येतो. दिवाणी न्यायाधीश डॉ. विक्रम अं. आव्हाड यांनी आगामी लोक अदालत मध्ये जास्तीत जास्त दाखलपूर्व प्रकाणाचा निपटारा करान्यात यावा तसेच या सुवर्णी संधीचा नागरिकांनी जास्तीत लाभ घ्यावा असे आवाहन केले.