जि.प. वरिष्ठ शाळा मोरगाव येथे केंद्रिय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
अर्जुनी/मोर.-२१व्या शतकात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
शैक्षणिक प्रक्रिया गतिमान करणे ,विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद गोंदिया व डायटद्वारे शिक्षण परिषदेचे आयोजन व उद्बोधन जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा,मोरगाव येथे उत्साहात संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा,मोरगाव चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक रेखा गोंडाने तर प्रमुख उपस्थिती सु.मो.भैसारे , रविंद्र वालोदे, वैशाली नवखरे, केंद्रातर्गत मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. याप्रसंगी अर्जुनी/मोर चे केंद्रप्रमुख दिनेश कापगते यांनी प्रास्ताविक भाषणातून ,शिक्षण परिषदेची भूमिका व महत्त्व विषद केले. तसेच विविध उपक्रमांची प्रभावी अंमल बजावणी करून, शिक्षकानी तंत्रज्ञान विषयक ज्ञान अवगत करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी गुणवत्ता विकसनासाठी कृतीयुक्त अध्ययन-अध्यापन करण्यासाठी विविध उपक्रमाची उपयुक्तता स्पष्ट केली.
याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून परिषदेचे अध्यक्ष रेखा गोंडाने म्हणाले की, शिक्षकांनी बदलत्या अध्ययन-अध्यापन पद्धती , बदलते शैक्षणिक धोरण व तंत्रज्ञान विषयक ज्ञान आत्मसात करून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकसनासाठी तत्परतेने कार्य करण्यासाठी उपक्रशील होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले . चर्चा , विचारविनिमय व समनव्यय या माध्यमातून यश प्राप्त करता येते असे विषद केले.
परीषदेत एक भारत श्रेष्ठ- भारत उपक्रम राष्ट्रीय ,राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१अन्वेषण व विश्लेषण, निपुण भारत अभियान, (एफ. एल. एन. )भाषिक उपक्रम व विद्यार्थ्यांचे भाषा विकास, सामाजिक शास्त्र कृती कार्यक्रम व अंमलबजावणी ,कार्यात्मक व्याकरण ,जीवनाभिमुख गणित, आदी विषयावर रूपाली मेश्राम, नमिता लोथे, आर.पी. उईके के. एन. हांडगे एम.पी. जांभुळकर आदी विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे, यांनी केले तर आभार प्रदर्शन जितेंद्र ठवकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुषेश्वर मेश्राम, व्ही. बी. भैसारे ,अचला कापगते, पपिता राऊत,उमा राऊत,रुचिता शहारे, समीक्षा राऊत,आचल हातझाडे, श्रावणी लाडे आदींनी सहकार्य केले.