जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वती विद्यालयाचे सुयश
अर्जुनी/मोर: क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय गोंदिया अंतर्गत जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय वयोगट 19 मुलींच्या संघाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला.सदर संघात मेघा चांदेवार,अनुष्का गोस्वामी,जान्हवी हर्षे,श्रुती मस्के, अनिशा हिंगे,मंतशा सय्यद,सानिका स्वान,हनी शेडमाके,रश्मी डोंगरवार,दिव्या कापगते,इशा लीचडे, मैथिली हत्तीमारे यांचा सहभाग असून त्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेमध्ये निवड झाली आहे.त्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण,उपप्राचार्या छाया घाटे, पर्यवेक्षक महेश पालीवाल,सर्व प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकवृंदानी त्यांचे अभिनंदन केले व विभागीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका माधुरी पिलारे यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.
——————————————————————————————
कला उत्सव स्पर्धेत सरस्वती विद्यालयाचे सुयश
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेचे आयोजन दिनांक 27 सप्टेंबरला पुंजाबाई पटेल अध्यापक विद्यालय गोंदिया येथे करण्यात आले. यात सरस्वती विद्यालया व कनिष्ठ महाविद्यालय अर्जुनी/ मोर. येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात चित्रकला स्पर्धेमध्ये स्नेहा जनार्दन भोयर वर्ग अकरावा या विद्यार्थिनीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला असून तिची निवड विभागीय स्तराकरता झालेली आहे.एकपात्री अभिनयामध्ये वर्ग नववीची विद्यार्थिनी अंजली शरद लंजे नी द्वितीय क्रमांक पटकाविला.शिवानी रवींद्र बहेकर वर्ग अकरावा हिने नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला तर वादन स्पर्धेमध्ये सोहम उमाकांत मेश्राम वर्ग नववा याने तृतीय क्रमांक मिळविला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने शाळेचे प्राचार्य जे.डी.पठाण, पर्यवेक्षक महेश पालीवाल, प्रा.नंदा लाडसे, प्रा.टि.एस. बिसेन व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका अर्चना गुरुनुले यांचे सुद्धा अभिनंदन करण्यात आले.