शारिरीक व मानसिक संतुलनासाठी योग प्राणायामाची कास धरावी योग शिक्षक कांतीकुमार बोरकर
अर्जुनी मोरगाव :- बदलत्या आधुनिक जीवनशैली मुळे प्रगती करत असतांना पाश्चात्त्य जीवन शैलीचे दुष्परिणाम समोर येत आहेत परिणामी मानसिक व शारीरिक आरोग्य प्रभावित होत आहे . शारीरिक व मानसिक आरोग्य साधून संतुलित जीवनासाठी योग प्राणायामाची कास धरावी असे प्रतिपादन योग शिक्षक कांतीकुमार बोरकर यांनी केले.ते श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी/मोर.द्वारा संचालित जयदुर्गा विद्यालय गौरनगर द्वारा गौरनगर येथे आयोजित पाच दिवसीय योग प्राणायाम शिबिरामध्ये शिबिरार्थ्यांकडून योगाभ्यास करून घेतांना बोलत होते.
दिनांक २४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर २०२४ दरम्यान ग्राम पंचायत परिसर मंदिर प्रांगणात पार पडलेल्या शिबिरामध्ये कांतीकुमार बोरकर यांनी क्रीडा शिक्षक नितीन गणवीर,सहा.शिक्षक संतोष बिसेन,शालेय योग समिती प्रमुख अर्पिता सरकार, कृष्णा सरकार, निशा मिस्त्री,जान्हवी कापगते,प्रेम सरकार यांच्या साहाय्याने उपस्थित विद्यार्थी व पालकांकडून योगाभ्यास करवून घेतला.सकाळी ५.३० ते ७.०० या वेळात संपन्न शिबिरामध्ये यौगिक जॉगिंग, सुक्ष्म व्यायाम,विविध आसने,सूर्यनमस्कार,दंड बैठक,स्वामी रामदेवजी महाराज प्रणित प्राणायाम,ध्यान सोबतच आयुर्वेद यावर प्रकाश टाकून उपस्थितांकडून योगाभ्यास करून घेण्यात आला.
विद्यालयाचे प्राचार्य सुनीलकुमार पाऊलझगडे यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक भुवेंद्र चौहान,प्रवीण सिंगाडे, प्रफुल्ल गोलेलवर, संघदीप कांबळे, नीरज नाकाडे, वैशाली कळपते,शंतनु साधू, निमाई मल्लिक, विद्यार्थी प्रतिनिधी अनिश मंडल, नितीन सरकार, बिरेंद्रनाथ बैद्य,फणिंद्र सरकार, निकिता सरकार, रिया मंडल, आदींनी परिश्रम घेतले.