विदर्भ

शिक्षकाचा सन्मान म्हणजे घडणाऱ्या पिढीचा आत्मविश्वास…!

पद्माकर रंगारी यांचे प्रतिपादन : शालेय व्यस्थापन समितीने केला सपत्नीक सत्कार

बाराभाटी :
ग्रामीण भागात घडणारे विद्यार्थी आणि त्यांना घडविणारे शिक्षक महत्त्वाचे घटक आहेत. गावात विद्यार्थी मिळवून शिक्षक शिकवितो आणि विद्यार्थी घडवितो. हे कार्य फार कसरतीचे आहे. सहवासात राहून शिक्षक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रगतीच्या मार्गावर आणतो. तेव्हा अशा शिक्षकाचा सन्मान होणे आवश्यक आहे आणि हे केलेच पाहिजे. म्हणून शिक्षकाचा सन्मान म्हणजे घडणाऱ्या पिढीचा आत्मविश्वास…! असे प्रतिपादन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पद्माकर रंगारी यांनी केले आहे. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावारुन बोलत होते.

यावेळी मंचावर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पद्माकर रंगारी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक श्री राऊत, सत्कार मुर्ती रविंद्र वालदे सेवानिवृत्त शिक्षक, मंगेश मेश्राम, दीपा घरतकर, शिशुपाल बेलखोडे, गीता मेश्राम, अल्का चव्हारे तसेच ग्रामपंचायत येथील कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

शिक्षक रवींद्र वालदे हे शिक्षण विभागासह नाटकाचे कलाकार व रसिक आहेत. तसेच सामाजिक सलोखा राखत एक उत्तम कार्यकुशल आहेत. अनेक पिढीला घडवत समाजासमोर नवा आदर्श नेहमी ठेवला आहे. नियत वयोमानानुसार प्रसंगी वालदे यांच्या पत्नीसह शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बाराभाटी येथे ( दि.३०) ला दुपारी ०४.०० वाजता संपन्न झाला.

सत्कार समारंभाचे संचालन व आभार शिक्षिका प्रज्ञा भवेश शहारे यांनी केले. तर स्वयंसेवीका पपीता बेलखोडे व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.