रवींद्रकुमार वालोदे यांच्या सेवानिवृत्तपर सत्कार समारंभ
अर्जुनी मोरगाव:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाराभाटी येथे कार्यरत असलेले रवींद्रकुमार वालोदे यांना नियत वयोमानाचे ५८ वर्षे पूर्ण झाल्याने, त्यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ समूह साधन केंद्र अर्जुनीच्या वतीने मोरया हॉटेल अर्जुनी /मोर या ठिकाणी संपन्न झाला.
रवींद्रकुमार जनार्दन वालोदे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाराभाटी पंचायत समिती अर्जुनी मोर येथे कार्यरत होते . जिल्हाप्रसाद गोंदिया येथे तब्बल २७ वर्षे त्यांनी सहाय्यक शिक्षक पदावर कार्य केले. ते एक उत्कृष्ट नाट्यकलाकार, गायक व विद्यार्थीप्रेमी शिक्षक होते. शासकीय निकषानुसार त्यांच्या कार्याची जाण ठेऊन, समूह साधन केंद्र अर्जुनी/ मोरगाव च्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा यथोजीत गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे तर विशेष अतिथी म्हणून केंद्रप्रमुख एन. एस. लंजे, बी डब्ल्यू .भानारकर ,सु.मो. भैसारे, गट व समन्वयक सत्यवान शहारे, तसेच सत्कारमूर्ती रवींद्र कुमार वालोदेचे आप्तस्वकीय, मित्रपरिवार , केंद्रांतर्गत मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे तर उपस्थितांचे आभार नरेंद्र बनकर यांनी केले.