शैक्षणिक

रत्नदीप विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

सडक अर्जुनी.:- 2 ऑक्टोंबर 2024 रोजी रत्नदीप विद्यालय चिखली येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंतीच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एल. एम. पातोडे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक एस. बी. मेंढे, एच.ए. लांडगे , जे. एस. कढव होते . महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी भाषण व गीत सादर केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक एल एम पाथोडे यांनी विद्यार्थ्यांना सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील इयत्ता 6 चा विद्यार्थी पुष्पक कोरे यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारली तसेच इयत्ता 9 चा विद्यार्थी लखन यावलकर याने लालबहादूर शास्त्री यांची वेशभूषा साकारली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कु. सुप्रिया टेंभुर्णे हिने केले तर आभार प्रदर्शन कु. मेघा भेंडारकर हिने मानले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेत स्वच्छता पंधरवडा निमित्त शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली.