रोजगार

राज्य शासनाने आठ हजार रुपये मासिक मानधन केल्याने ग्रामरोजगार सेवकांनी केला जल्लोष

आज महायुती सरकार मधील मान्यवरांचा सत्कार

संतोष रोकडे, अर्जुनी मोर. :- राज्यातील महायुती सरकारने ग्रामरोजगार सेविकांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी पुर्ण करुन ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मासिक मानधन लागु केल्याने अर्जुनी मोर तालुक्यातील ग्रामरोजगार सेवक संघटनेने शासनाचे आभार मानुन पंचायत समिती सभागृहात आज ता.3 ऑक्टोबर रोजी पेढे वाटून एकच जल्लोष केला.
महाराष्ट्र शासनाने ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मासिक मानधन जाहीर केल्याने अर्जुनी मोर. ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीने आज तिन ऑक्टोबर ला जल्लोष सभा संघटनेचे अध्यक्ष संतोष रोकडे यांचे अध्यक्षतेखाली घेतली. यावेळी फटाके फोडून व पेढे वाटुन शासनाचे आभार मानले.तसेच चार ऑक्टोबर रोजी पंचायत समिती सभागृहात शासनाचे अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनीधींचा सत्कार व आभार कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यावेळी विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी सामाजीक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आपल्या हक्काचा माणूस डाॅ. सुगत चंद्रिकापुरे व अन्य मान्यवरांचा सत्कार व आभार कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेविकांनी तसेच विशेष आमंत्रीतांनी पंचायत समिती सभागृह अर्जुनी मोर. येथे उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष रोकडे यांनी केले आहे.