शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना गांभीर्याने घ्यावे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे

जयदुर्गा विद्यालय गौरनगर येथे योगासन व सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजीत

अर्जुनी /मोरगाव :- प्रत्येकाने स्वप्न पहावे परंतु स्वप्नांना साकार करण्याकरिता अथक परिश्रम घ्यावे लागते त्यासाठी नियोजन करून विद्यालयीन स्तरावरूनच स्वप्नपूर्ती करिता स्पर्धा परीक्षांना गांभीर्याने घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी केले. ते श्री गणेश बहुउद्देशीय संस्था अर्जुनी/मोर. द्वारा संचालित जयदुर्गा हायस्कूल एवं ज्यु. कॉलेज गौरनगर तर्फे आयोजित खुल्या योगासन व सामान्य ज्ञान स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

संस्थेचे अध्यक्ष अशोक मोहनलालजी चांडक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उद्घाटन समारोह प्रसंगी अर्जुनी मोर.चे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर.चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलांबर गाईन, जिल्हा योग असोसिएशन गोंदिया चे अध्यक्ष सुरेश कोसरकर,सचिव विनायक अंजनकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शशांक वैद्य, पोलीस पाटील रत्ना मिस्त्री, विद्यालयाचे प्राचार्य सुनीलकुमार पाऊलझगडे, जि. प. विद्यालय गौरनगर चे मुख्याध्यापक चंद्रशेखर हेमके, जिल्हा परिषद विद्यालय ताडगाव चे मुख्याध्यापक माकुलवार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी संस्था अध्यक्ष व विद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल,श्रीफळ व ग्रामगीता भेट देऊन सत्कार करण्यात आला.
पुष्पनगर चे वयोवृद्ध नागरिक विष्णु शील यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयात आयोजित योगासन व सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये दोन्ही गट मिळून परिसरातील 150 विद्यार्थी सहभागी झाले होते. योगासन स्पर्धेमध्ये कनिष्ठ गटात (वर्ग पाच ते आठ) सरस्वती विद्यालय अर्जुनी/मोर. चे कुलदीप राहुल ब्राह्मणकर आशुतोष दामोदर गहाणे तर वरिष्ठ गटात (९ ते 12) सरस्वती विद्यालय अर्जुनी/मोर.च्या विद्यार्थिनी कु.रिया देवेंद्र नाकाडे कु. निकुंज देविदास हेमने ह्या अनुक्रमे प्रथम व द्वितीय आल्यात .यावेळी कु. अर्पिता कृष्ण सरकार, सौ.संगीता अर्जुन नवघरे,सौ.तिलोत्तमा अरविंद काशीवार,सौ.जयश्री प्रमोद कापगते, सौ. रेखा वालोदे यांना प्रोत्साहनपर पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचे परीक्षण जिल्हा योग असोसिएशन गोंदिया चे सचिव विनायक अंजनकर, तालुका योग असोसिएशन च्या श्रीमती माधुरी वनवे,श्रीमती रंजना राहुल ब्राह्मणकर, कु. ऋतुजा राहुल ब्राह्मणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. शिक्षक कांतीकुमार बोरकर, प्रणाली ब्राह्मणकर,अर्पिता सरकार यांनी केले तर विद्यार्थी प्रतिनिधी अनिश मंडल ह्याने मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक नितीन गणवीर सहा.शिक्षक संघदीप कांबळे, प्रवीण शिंगाडे,भूवेंद्र चव्हाण, वैशाली कडपते, प्रफुल्ल गोल्लेलेवर,संतोष बिसेन, नीरज नाकाडे, ममता लंजे,हितेश तीतीरमारे,शंतनु साधू, यादव तरोणे, नीमाई मल्लिक,लेनिन कापगते,देवेंद्र फुंडे, विवेक मंडल,दिव्या सरकार,ज्योतिका बाछाड, नितीन सरकार इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.