अर्जुनी मोर. शहराच्या विकासासाठी सदैव कटीबध्द: माजी मंत्री राजकुमार बडोले
विविध प्रभागात 4 कोटी 80 लाख रु. निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन
अर्जुनी मोर :- शहराच्या विकासासाठी माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक न्याय मंत्री असताना त्यांनी शहराच्या सर्व प्रभागांमध्ये विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला होता. आता, त्यांनी या विकास प्रक्रियेत अजून वेग आणत, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत 4 कोटी 80 लाख रुपये निधी खेचून आणला आहे. यामुळे शहराच्या विविध प्रभागांमध्ये विकासकामे सुरू होणार असून स्थानिक नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
माजी मंत्री बडोले यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निधीमुळे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे आणि भविष्यात अर्जुनी मोरचा कायापालट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” त्यांनी स्थानिक नागरिकांच्या विश्वासावर आणि प्रेमावर आभार व्यक्त केले आणि भविष्यकालीन विकास कामांसाठीही अशा प्रकारे साथ देण्याचे आवाहन केले.
या भूमिपूजन कार्यक्रमास नगरपंचायत नगराध्यक्षा मंजुषाताई बारसागडे, उपाध्यक्षा ललिताताई टेंभरे, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विजय कापगते, बांधकाम सभापती राधेशाम भेंडारकर, पं.स. सदस्य डॉ. नाजुक कुंभरे, नूतनलाल सोनवाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरसेवक संजय पवार, ममताताई भैय्या, इंदुताई लांजेवार, संध्याताई शहारे, भाजप महिला अध्यक्ष गीताताई ब्राह्मणकर, माजी नगरसेवक देवेंद्र टेंभरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकही उपस्थित होते.
या विकास कामांमुळे शहरातील पायाभूत सुविधा सुधारणार असून नागरिकांना रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा आणि इतर आवश्यक सेवांचा लाभ मिळणार आहे.