इंटरनेटचा सुरक्षित वापर व मीडिया साक्षरता विषयाच्या नाटकाला प्रथम पारितोषिक
अर्जुनी मोर. :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया द्वारा भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धा(दि 9)रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल मधील इयत्ता नववी च्या विद्यार्थ्यांनी इंटरनेट चा सुरक्षित वापर व मीडिया साक्षरता या विषयावर नाटक सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.तसेच पर्यावरण संरक्षण विषयावर लोकनृत्य सादर करून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अर्जुनी मोरगाव गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचायत समिती अर्जुनी चे विषयतज्ञ सत्यवान शहारे यांनी केले. तर प्रास्ताविक भाषणातून पी. बी.कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर ठेवणे व सोशल मीडिया च्या आहारी जाण्याचे दुष्परिणाम तसेच पर्यावरणाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात आपुलकी निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते असे सांगितले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद विद्यालयाचे प्राचार्य डब्लू. व्ही. येरणे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती अर्जुनी चे विषय तज्ञ मेश्राम सर , पडोळे मॅडम, रामटेके मॅडम सुद्धा उपस्थित होते. चव्हाण साहेब यांनी विद्यालयाचे प्राचार्य,मार्गदर्शक शिक्षिका निकिता मानापुरे, सरिता ठाकरे , शीतल नागपुरे सर्व शिक्षक , आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.