शैक्षणिक

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी

बोडगांव देवी प्रतिनिधी :अर्जुनी मोरगांव तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना अंतर्गत उपकेंद्र डोंगरगाव च्या वतीने भारतीय आदिवासी आश्रम शाळा सिरेगावबांध येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

उपस्थित विद्यार्थ्यांची जलद ताप रूग्ण सर्वेक्षण व आरडीके तपासणी करण्यात आली आहे.३६५ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यावेळी करण्यात आली. परिसर स्वच्छतेविषयी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक स्वच्छतेसंबंधी आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याविषयी शाळा प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या तपासणी कार्यक्रमात आरोग्य उपकेंद्र डोंगरगावचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. बन्सोड यांच्यासह, आरोग्य पर्यवेक्षक राऊत,आरोग्यसेवकसातारे,पिपरे,बनकर,आरोग्य सेविका काटवले यांनी यावेळी संदर्भ सेवा प्रदान केली.