तंत्रज्ञान

के.टी.एस. सामान्य रुग्णालय गोंदिया टिम तर्फे मानसिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित

बोडगांव देवी :- अर्जुनी मोरगांव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना येथे दि.६ डिसेंबर रोजी गरोदर मातांचा शिबीर घेउण अतिजोखिम माता शोधून संदर्भित करण्यात आले. यावेळी अतिजोखिम मातांना योग्य तपासणी, सल्ला व औषधउपचार डॉ.मनोज डोंगरवार (बालरोगतज्ञ) आणि डॉ.पल्लवी नाफडे (स्त्रीरोग तज्ज्ञ) यांनी दिला आहे.

याठिकाणी सर्वप्रथम ६ डिसेंबर महपरिनिर्वाण दिनानिमित्ताने भारतीय राज्यघटनेचे आदर्श शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. श्वेता कुलकर्णी व प्रा.आ.केंद्रातील आदी आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सर्व गरोदर मातांची बायओड टेस्टिंग जसे बी ग्रुप, सिकलसेल, थायसेमीया, हायपाटीस बी, सिप्टी, सिफोलीस, हाईमोग्लोबिन, थायरॉईड, सुगर, रक्तदाब, मूत्रचाचणी, पोटाचा घेर, बाळाचे ठोके या सर्व चाचण्या फेटाल डोप्पलर या मशीनद्‌वारे विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व डिजिटल वजन काट्याने वजन मोजण्यात आले
त्याच बरोबर सोनोग्रापीची रिपोर्ट तपासण्यात आली व कमीत कमी तीन सोनोग्राफी झाले किंवा नाही आणि व्हीनस ब्लड सॅम्पलिंग ने हाईमोग्लोबिन झाले किंवा नाही याची खात्री करण्यात आली ब्लड ट्रान्सफिसनसाठी सिकलसेल गरोदर मातेला संदर्भित करण्यात आले

प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना याठिकाणी के.टी.एस रुग्णालय गोंदिया वरून मानसिक हेल्थ टीम आली आणि त्यामध्ये नवीन रुग्णांनी २० रुग्णांनी मानसिक हेल्थ शिबीराचा लाभ घेतला असून त्याचवेळी औषधउपचार सुद्धा देण्यात आले. यावेळी गरोदर आणि स्तनदा माता यांना योगासनाचे धडे देऊन जेवण देण्यात आले. पुढील शिबीराची ता.२० डिसेंबर असून पुढील तारखेला संबंधित उपकेंद्राचे लाभार्थी यांना ऍम्ब्युलन्सने प्राथमिक आरोग्य केंद्र चान्ना याठिकाणी नेवून देण्यात येईल अशी माहिती प्रा.आ.केंद्र चान्ना येथील संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांच्या या माध्यमातून कळविण्यात येते आहे.