विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श विचार आजही प्रेरणास्रोत – निरूपा बोरकर
-आनंद बुद्ध विहार खांबी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
बोडगांव देवी :-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आजही देशभरात प्रेरणास्त्रोत आहे. सामाजिक न्याय, शिक्षण आणि समता या क्षेत्रात त्यांनी सुरू केलेली क्रांती नेहमीच प्रासंगिक राहील. त्यांच्या कल्पना आणि योगदान वंचितांच्या सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरले. भारतामध्ये संविधान आणि लोकशाहीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा बाबा साहेब डॉ भीमराव आंबेडकर यांचे नाव ठळकपणे घेतले जाते. त्यामुळेच भारतीय इतिहासात ६ डिसेंबर ही महत्त्वाची तारीख म्हणून नोंदवली जाते. या दिवशी देशभरात महापरिनिर्वाण दिन म्हणून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली जाते. या दिवशी भारताच्या राज्यघटनेचे निर्माते, समाजसुधारक आणि दलितांचे मसिहा आंबेडकर यांचे १९५६ मध्ये निधन झाले.
वास्तविक, भारतात ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो. महापरिनिर्वाण म्हणजे बौद्ध धर्मातील आत्म्याची मुक्ती. आणि आंबेडकरांच्या महान आत्म्याला शांती आणि त्यांच्या अमूल्य सेवेचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच अनुषंगाने ६ डिसेंबर महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अर्जुनी मोरगांव तालुक्यातील खांबी येथील आनंद बौध्द विहार याठिकाणी बौध्द समाजातील सर्व उपासक व उपासिका यांनी महामानवाच्या कार्यप्रणालीला उजाळा देऊन अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रा.प.सरपंच निरूपा बोरकर आणि माजी उपसरपंच प्रमोद डोंगरे यांच्या हस्ते सर्वप्रथम शांतीचे अग्रदूत महाकारुनी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना पुष्प व भारतीय राज्यघटनेचे आदर्श शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी ग्रा.प सरपंच निरूपा बोरकर, माजी उपसरपंच प्रमोद डोंगरे, माजी उपसरपंच विजय लोणारे, शिक्षक जितेंद्र बोरकर, पत्रकार विश्वरत्न रामटेके, सामाजिक कार्यकर्ता सुदेश लोणारे, चिंदू रामटेके, ग्रा.प संगणक चालक योगेश लोणारे, आ.बौ.विहार समितीचे अध्यक्ष नूतन मेश्राम,शैलेंद्र बोरकर, हर्षपाल लोणारे, निकेश बोरकर, श्रेयश रामटेके, सुरज रामटेके वैभव रामटेके अशा सेविका कोमल रामटेके, माजी ग्रा.प सदस्या छबिला रामटेके, माजी ग्रा.प सदस्या कविता रामटेके, सुनंदा डोंगरे, शालू रामटेके, ललिता डोंगरे, इंदू रामटेके, आरती रामटेके आदी उपासक व उपासिका उपस्थित होते.