पिंपळगांव/खांबी येथे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
बोंडगाव देवी :- अटल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत निमगाव केंद्राचे केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ग्राम पिंपळगाव येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर बुधवारी (दि. ११) आयोजित करण्यात आले आहे.
उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य कविता कापगते यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य संदीप कापगते, शालिनी डोंगरवार, सरपंच विलास फुंडे, बंदेश्वरी राऊत, निरूपा बोरकर, प्रदीप कांबळे, उपसरपंच संदीप पुस्तोडे, तुलाराम खोटेले, छगन पातोडे, गटविकास अधिकारी शंकर वैद्य, गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक भोजराम राहिले, शिक्षण विस्तार अधिकारी बी. डब्ल्यू, भानारकर तसेच गावातील पदाधिकारी उपस्थित
राहणार आहेत. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाविषयी आकर्षण वाटावे, विद्यार्थ्यांचा शारीरिक व बौद्धिक विकास व्हावा, यासाठी नव्या नियमानुसार केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो-खो यासारख्या सांघिक क्रीडा स्पर्धा तसेच धावणे, लांब उडी, बुद्धिबळ, प्रश्नमंजूषा, प्रेक्षणीय कवायत, एकपात्री अभिनय, वैयक्तिक गायन, सांस्कृतिक गायन, नृत्य, वैयक्तिक क्रीडा स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. महोत्सवासाठी मुख्याध्यापक एस. आर. मेंढे, बी. ए. काळसर्पे, जी. आर. गायकवाड यांच्यासह निमगाव केंद्रातील सर्व शिक्षक सहकार्य करीत आहेत.