शैक्षणिक

पंचशील विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न

बोडगांव देवी :- अर्जुनी मोरगांव तालुक्यातील पंचशील विद्यालय बाराभाटी येथे दिनांक १० व ११ डिसेंबर २०२४ या दोन दिवशीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी यशस्वीरित्या पार पडले. दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शनीचे उद्घाटक म्हणून यशवंतजी गणवीर शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद गोंदिया तर अध्यक्ष म्हणून सविता कोडापे सभापती पं.स अर्जुनी मोर तसेच विशेष अतिथी म्हणून होमराज पुस्तोडे उपसभापती पं.स.अर्जुनी मोर, कविता कापगते जि.प सदस्या, शालिनी डोंगरवार पं.स सदस्या, गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, केंद्रप्रमुख नाजूकराम लंजे, पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.एम चव्हाण, सहाय्यक शिक्षक डी.एच मेश्राम, तालुका विज्ञान संयोजक बनसोड, गटसमन्वयक ढोके व सत्यवान शहारे यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा पार पडला. तालुक्यातील एकूण प्राथमिक, माध्यमिक, आदिवासी व दिव्यांग गटाचे मिळून चाळीस विद्यार्थ्यांनी तसेच काही शिक्षकांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाची मार्गदर्शन केले. मार्गदर्शनानंतर मान्यवरांनी फीत कापून विज्ञान प्रदर्शनीचे रीतसर उदघाटन केले. त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी आणलेल्या मॉडेलची पाहणी केली.

या प्रदर्शनीचे( दि. ११ डिसें) रोजी समारोपीय कार्यक्रम घेण्यात आले. अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत बाराभाटी सरपंच सरस्वताबाई चाकाटे, विशेष अतिथी म्हणून उपसरपंच किशोर बेलखोडे, पोलीस पाटील हेमलता खोब्रागडे, गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, जि.प.प्राथ शाळा बाराभाटी येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पद्माकर रंगारी, पंचशील शाळेचे मुख्याध्यापक व्ही एम चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक डी.एच मेश्राम, समितीचे पदाधिकारी सौ चौरीकर, सिंहगडे मॅडम तसेच पंचायत समितीचे गट समन्वयक सत्यवान शहारे, ढोके व बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. उत्कृष्ट मॉडेल व उत्तम सादरीकरण या जोरावर सर्व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी सहभागी विद्यार्थ्यांनी मान्यवरासह परीक्षकांचीही मन जिंकली. निपक्ष:पातीपणे परीक्षकांनी परीक्षण केले. बक्षीस वितरणापूर्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या दोन दिवशीय तालुकास्तरीय प्रदर्शनीचे नियोजन उत्तम पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण यांनी पंचशील विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. उदघाट्नीय कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक प्रमुख टी.के भेंडारकर तर समारोपीय कार्यक्रमाचे संचालन क्रीडा प्रमुख आर डी कोल्हारे यांनी केले. आभार प्रदर्शन गणित तथा विज्ञान शिक्षक ए.डी घानोडे व एन.बी गहाणे मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाचे छायाचित्रण व व्हिडिओ निर्मितीचे कार्य शाळेतील सहाय्यक शिक्षक जे.एम दोनाडकर यांनी उत्तमरित्या पार पाडले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक पाटणकर, नंदागवळी व इतर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम नी करण्यात आली.